ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या रागामुळे चर्चेत असतात. कधी पापाराझींवर तर कधी त्यांच्या चाहत्यांवर त्या रागवताना दिसून येतात. त्यामुळे बहुतेक लोकांना त्यांचे वागणे आवडत नाही. अनेकदा जया बच्चन यांना त्यांच्या रागामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील केले गेले आहे. जया बच्चन यांच्या रागाचा असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन पापाराझींवर ओरडताना दिसत आहेत.
मंगळवारी ‘द आर्चीज’ चित्रपटाचा स्क्रिनिंग शो पार पडला. यावेळी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी जया बच्चन देखील दिसून आल्या. यावेळचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्या नेहमीप्रमाणे पापाराझींवर ओरडताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला जया बच्चन टीना अंबानीसोबत पोझ देताना दिसत आहेत. याचदरम्यान जया बच्चन पापाराझींवर ओरडू नका असं म्हणत ओरडल्या.
View this post on Instagram
जया बच्चन यांना नेहमीप्रमाणे रागावलेलं पाहून युझर्स सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करत आहेत. एकाने लिहिलंय की, ‘ही नेहमी रागात का असते?’ तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘ही जरा जास्तच गर्विष्ठ’ आहे. तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, ‘बिचारा अमिताभ’
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसल्या होत्या जया
आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. करण जोहरच्या या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्यासोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील मुख्य भूमिकेत होते.
हेही वाचा :