Wednesday, June 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला' नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला’ नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला' असे शब्द असलेल्या गाण्यातून त्यांनी जेजुरी आणि खंडेरायाची महती सांगितली आहे

Related Story

- Advertisement -

सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय का’ ह्या गाण्याने घराघरात पोहचलेले मारुती चव्हाण आणि “बाळुमामाच्या नावानं चांगभलं” या सुप्रसिद्ध मालिकेच्या शीर्षकगीताचे गायक सौरभ साळुंके आता नवाकोरा म्युझिक व्हिडिओ घेऊन आले आहेत. ‘जेजुरीचा खंडेराया नवसाला पावला’ असे शब्द असलेल्या गाण्यातून त्यांनी जेजुरी आणि खंडेरायाची महती सांगितली आहे.साईनाथ राजाध्यक्ष आणि गौरी मारुती चव्हाण यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. म्युझिक व्हिडिओची संकल्पना आणि कोरिओग्राफी मारुती चव्हाण यांची आहे. मारुती चव्हाण आणि सुनील सकट यांच्या शब्दांना मोनु अजमेरी यानी संगीतबद्ध केलं आहे, तर सौरभ साळुंके यांनी गाने गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश दिंडाले,छायांकन प्रशांत मांढरे यांनी केलं असून, मारुती चव्हाण यांच्यासह प्रियांका मोरे यांच्यावर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. “सप्तसूर म्युझिक” च्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ आपल्याला पाहता येणार आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Saptsurmusic (@saptsurmusic)

- Advertisement -

उत्तम शब्द, दमदार संगीत आणि नृत्याची मेजवानी या गाण्यात आहे. त्याशिवाय जेजुरी गडाचं नयनरम्य चित्रीकरण ही या गाण्याची खासियत आहे. त्यामुळे खंडेरायाच्या भक्तांना हे गाणं नक्कीच आवडेल यात शंका नाही.


हे हि वाचा – लोकांवर पुन्हा चढेल का हिमेशचा ‘सुरूर’? हिमेशचं ‘सुरूर2021’ सॉन्ग रिलीज

- Advertisement -