घर मनोरंजन TMKOC : "फीमेल को-स्टार देखील माझी साथ देत नाहीत", जेनिफर मिस्त्रींची खंत

TMKOC : “फीमेल को-स्टार देखील माझी साथ देत नाहीत”, जेनिफर मिस्त्रींची खंत

Subscribe

या शोमध्ये जेनिफरचे काम मार्च महिन्यात शेवटचा एपिसोड शूट केला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत अभिनेत्रीला तिच्या कामाचे पैसे मिळालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही जगतातील सर्वात पॉपुलर सिरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) रोशन भाभीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवाल (Jennifer Mistry Bansiwal) या चर्चेत आल्या आहेत. जेनिफरने एका मुलाखतीत शोचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. जेनिफरने म्हटले की,”शोच्या फीमेल को-स्टार्स देखील माझी सात देत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

जेनिफर म्हणाल्या की, “शोच्या फिमेल को-स्टार्स देखील माझी सात देत नाहीत. कोणीही माझ्या बाजूने उभे राहण्यास तयार नाहीत. प्रत्येकाला आपली इनसिक्योरिटी आहे.” जेनिफर पुढे म्हणाल्या, “एवढे दिवसत माझ्यासोबत झालेल्या छळा लपवून ठेवला होता. याबद्दल मी कुठेच वाचता केली नाही. माझ्यासोबत झालेले लैंगिक छळ हे कोणाच्या सांगण्यावरून  जगासमोर आले नाही. मला काही लोकांची सात मिळाली, पण मी त्यांचे नाव सांगू शकत नाही.

- Advertisement -

या शोमध्ये जेनिफरचे काम मार्च महिन्यात शेवटचा एपिसोड शूट केला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत अभिनेत्रीला तिच्या कामाचे पैसे मिळालेले नाही. “मी शो सोडण्यापूर्वीच विचार केला की, मी माझे पैसे मागणार नाही. माझे साडेतीन महिन्याचे पैसे येणे बाकी आहे. ती रक्कम मोठी असून आता माझ्या बँकेच्या खात्यात एक लाखापेक्षा कमी पैसे आहेत. माझ्या माहेरी आम्ही सात मुली आहोत. त्या सर्वांची देखभाल मी एकटीच करते,” असे त्यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

मी घाबरलेली नाही

देव तिला साथ देईल, असा जेनिफरचा विश्वास आहे.  जेनिफर म्हणाल्या, “माझ्या बँक खात्यात ८० हजार रुपये आहे. देवाने जर पोट दिले आहे, तर ते भरण्याची सोय ही केलेली असते. देवाने नेहमी माझी रक्षा केली आहे. मी कोणाला घाबरत नाही. जेनिफर या सध्या मुंबईत नाहीत. मुंबई पोलिसांनी त्यांना कॉल केला होता. पोलिसांना त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरबद्दल चौकशी करण्यासाठी त्यांना कॉल केला. यापूर्वी लैंगिक छळ यासारख्या शब्दांची मला भीती वाटत होती. परंतु, आता नाही.

जेनिफरने मुलाखतीत सांगितले की, मला नोटीस मिळाली आहे. माझ्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याचे त्या नोटीसीत लिहिले असून मला या नोटीसीचे सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. नोटीस वाचून मी घाबरली होती. पण, माझे वकील अमित खरे यांनी मला १५ वर्षांपासून सेटवर मला ज्या गोष्टींचा त्रासत सहन करावा लागला. त्याबद्दल लिहायला सांगितले. मी लिहिले तेव्हा वकिलांनी मला सांगितले की, जेनिफर हा लैंगिक छळ आहे. मला भीती वाटली कारण हा शब्द माझ्यासाठी मोठा खूप आहे. माझ्यात तेवढी हिम्मत नाही. पण, वकिलाने मला समजावले. सुरुवातीला, मी निर्मात्यांना कोणतीही नोटीस पाठवली नाही. परंतु हो, मी सोहिल रामनानीला माझे १५ वर्ष जुने अनुभव व्हाट्सएपवर सांगितले.

दरम्यान, त्यांने ते वाचून दुर्लक्ष केले आहे. सगळे वाचून हे लोक शांत बसतील असे वाटले. मी त्यांना सांगितले की, माझे काम संपले आहे. पण, त्या लोकांनी माझ्यावर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. यानंतर मी ८ एप्रिल रोजी लोकांना लैंगिक छळाची नोटीस पाठवली.

हेही वाचा – TMKOC : …म्हणून मी गप्प होते; जेनिफर मिस्त्रींनी नवा व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

 

- Advertisment -