‘तख्त’ मिळणं भाग्याचं, पण तितकंच जबाबदारीचं

करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी खूप मोठं आवाहन असल्याचं, जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितलं.

janvi kapoor takht movie
जान्हवी कपूर (फाईल फोटो/इन्स्टाग्राम)

धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. पहिल्याच चित्रपटामुळे लाईम लाईटमध्ये आलेली जान्हवी सध्या स्टारडम अनुभवते आहे. त्यातच ‘सोने पे सुहागा’ म्हणजे धडकनंतर आता जान्हवीच्या दोन नवीन चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्यापैकीच एक म्हणजे करण जोहर निर्मित ‘तख्त’ हा चित्रपट. नुकतचं तख्त चित्रपटातं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, सगळीकडे या बीग बजेट आणि मल्टिस्टारर चित्रपटाचा बोलबाला आहे. ‘तख्त’मध्ये रणवीर सिंह, करिना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर आणि जान्हवी कपूर अशी तडगी स्टारकास्ट आहे. धडक चित्रपटानंतर जान्हवीला इतका मोठा चित्रपट मिळाल्यामुळे तिचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये. ‘धडक’च्या सक्सेस पार्टीमध्ये बोलत असताना जान्हवीने ‘तख्त’ विषयीच्या आपल्या भावना केल्या. यावेळी जान्हवीची सख्खी बहिण खुशी कपूर आणि धडकचा हिरो ईशान खट्टर आणि दिग्दर्शक शशांक खेतानही हजर होते. एक नजर टाकूया ‘तख्त’च्या पहिल्या पोस्टरवर…

 सौजन्य- इन्स्टाग्राम (करण जोहर)

जान्हवी कपूरचा आगामी ‘तख्त’ हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. तख्त सारख्या चित्रपटात मिळालेल्या संधीबद्दल जान्हवीला विचारले असता ती म्हणाली, ”धडक नंतर थेट एक ऐतिहासिक चित्रपट करण्याची संधी मिळणं हे अविश्वसनीय आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढी मोठी संधी देणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तख्त चित्रपटातील अन्य कलाकार हे खूप नावजलेले आणि काही तर सिनिअर आहेत. त्यामुळे त्या सर्वांसोबत काम करणं हे माझ्यासाठी एक मोठं आवाहन आहे. तख्त चित्रपटाचा भाग व्हायती संधी दिल्याबद्दल मी करण जोहरचे आभार मानते.”
हेही वाचा:  जान्हवी कपूर आणि वरुण धवन येणार एकत्र?

 सौजन्य- इन्स्टाग्राम (करण जोहर)