घरमनोरंजन'The Kashmir Files' टॅक्स फ्री झाल्यावर 'Jhund' निर्मातीने केला सवाल

‘The Kashmir Files’ टॅक्स फ्री झाल्यावर ‘Jhund’ निर्मातीने केला सवाल

Subscribe

काश्मिरी पंडिताच्या नरसंहारावर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. दरम्यान देशभरातून या चित्रपटाचे कौतुक होत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 100 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. इतकेच नाही तर अनेक राज्यात या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले आहे. जेणे करून अधिकाधिक लोक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचतील. मात्र ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यावर आता ‘झुंड’ चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ करमुक्त केला आहे तर आमचा चित्रपट देखील तितकाच महत्त्वाचा असलयाचे म्हटले आहे.

सविता राज हिरेमठ यांनी शुक्रवारी एक फेसबुक पोस्ट पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, तिचा ‘झुंड’ हा चित्रपट कमी महत्त्वाचा नाही. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, ‘मी नुकताच ‘काश्मीर फाईल्स’ पाहिला. यातील काश्मिरी पंडितांच्या पलायनाची कहाणी ही हृदयद्रावक आहे आणि ती सांगण्याची गरज आहे. काश्मिरी पंडितांसाठी हा एक चांगला आवाज बनत आहे. पण ‘झुंड’चा निर्माती म्हणून मला धक्का बसला आहे. शेवटी ‘झुंड’ हाही महत्त्वाचा चित्रपट आहे. यात एक कथा आणि एक मोठा संदेश देण्यात आला आहे, ज्याची प्रेक्षकांनीही प्रचंड प्रशंसा केली आहे.

- Advertisement -

सविता राज यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, चित्रपट निवडण्यासाठी आणि तो मनोरंजन कर मुक्त करण्यासाठी सरकारचे कोणते निकष आहेत? ज्याच्या आधारावर सरकार चित्रपट करमुक्त करू शकते, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. सोशल मीडियाद्वारे किंवा कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची रजा देऊनही या चित्रपटाला पाठिंबा देता येऊ शकतो. पुढे सविता त्यांनी आपल्या चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘झुंड’ हा विषय आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटात केवळ जातीय आणि आर्थिक विषमता यावर चर्चा करण्यात आली नाही. उलट ‘झुंड’ समाजातील खालच्या स्तरातील लोकांना त्यांची यशोगाथा बनवण्याचा मार्गही दाखवतो.

‘झुंड’ हा चित्रपट 4 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, ज्यामध्ये अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. यात बिग बींनी विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे. विजय बारसे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची एक टीम तयार करत त्यांना नवी प्रेरणा दिली. नागराज पोपटराव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -

त्याचवेळी ‘द कश्मीर फाईल्स’बद्दल सांगायचे तर, ‘झुंड’च्या एका आठवड्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘द काश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 120 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार असे स्टार्स दिसले आहेत. आत्तापर्यंत हा चित्रपट गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त झाला आहे.


Varun Dhawan करतोय ‘या’ साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -