घरक्राइमJiah Khan Case : राबिया खान उच्च न्यायालयात जाणार

Jiah Khan Case : राबिया खान उच्च न्यायालयात जाणार

Subscribe

नवी दिल्ली : जिया खान (Jiah khan) मृत्यू प्रकरणी सीबीआय न्यायालयाने 10 वर्षांनंतर सूरज पांचोलीला (suraj pancholi) दोषी न ठरवता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी हा आनंद फार काळ टिकणार नाही. कारण जिया खानची आई राबिया खान (Rabia khan) आता उच्च न्यायालयात जाणार आहे.

राबिया खान यांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्याअभावी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, परंतु त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले की, जिया खानची हत्या झाली आहे, त्यामुळे हे प्रकरण आता मी उच्च न्यायालयात नेणार आहे. आज आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप वगळण्यात आला आहे, पण माझा प्रश्न आहे की माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला?, असा प्रश्न राबिया खान यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

3 जून 2013 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी जिया खानने जुहू येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणी जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय जियाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास करत असताना सहा पानी सुसाईड नोट सापडली होती, ज्याच्या आधारे सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, 21 जून 2013 रोजी सूरज पांचोलीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अखेर 1 जुलै 2013 रोजी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर 2021 मध्ये जिया खान आत्महत्या प्रकरण विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाचा तपास 20 एप्रिल 2023 रोजी पूर्ण झाला. न्यायमूर्ती एएस सय्यद यांनी निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने सूरज पांचोलीची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्याचे जाहिर केले. याप्रकरणी जियाची आई राबिया खान गेल्या दहा वर्षांपासून आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी करत आहे.

सूरज पांचोलीवर गंभीर आरोप
राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर गंभीर आरोप करताना म्हटले होते की, तिच्या मुलीसोबत त्यांने गैरवर्तन केले होते आणि गर्भपातासाठी जबरदस्ती केली होती. जिया खानच्या मृत्यूनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने कोणाचेही नाव न घेता आपली व्यथा मांडली होती. माध्यमांतील वृत्तनुसार जिया खान आणि सूरज पांचोलीची पहिली भेट फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. त्यावेळी दोघेही इंडस्ट्रीत नवीन होते.

जिया खानचा पोस्टमार्टम रिपोर्ट
जिया खानच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितले होते की, जियाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर सर्व आरोप केले आणि गेली दहा वर्षे ती आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा देत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -