Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जिशू गुप्ता होणार सिंगल फादर, 'बाबा बेबी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

जिशू गुप्ता होणार सिंगल फादर, ‘बाबा बेबी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

सरोगसीच्या माध्यमातून जिशू फादर होणार आहे. विशेष म्हणजे एक नाही तर दोन मुलांचा तो बाप होणार आहे.

Related Story

- Advertisement -

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता जिशू सोनगुप्ताने आता त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मात्र ही गूड न्यूज ऐकून चाहते हैराण होणार आहेत. त्यामागील कारणही तसेच आहे. जिशू सेनगुप्ता आता सिंगल फादर होणार आहे. याबातमीमुळे जिशूचा संपूर्ण चाहतावर्ग थक्क झाला आहे. सरोगसीच्या माध्यमातून जिशू फादर होणार आहे. विशेष म्हणजे एक नाही तर दोन मुलांचा तो बाप होणार आहे. मात्र हे त्याच्या रिअल लाईफमध्ये नाहीतर रिल लाईफमध्ये घडणार आहे. विंडो प्रोडक्शनच्या बॅनरखाली असलेला चित्रपट बाबा बेबी ओममध्ये जिशू गुप्ता एक दमदार झळकणार आहे. गेल्या वर्षी चित्रपटाच्या निर्मात्या नंदिता रॉय आणि शिबो प्रसाद मुखर्जीने या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करुण या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Unsung Bollywood (@kajalwilben)

 चित्रपटाच्या भूमिकेविषयी सांगताना जिशू म्हणाला की, या चित्रपटाची कथा वेगळी आहे. मी अशा पद्धतीची भूमिका यापूर्वी केलेली नाही. लहान मुलांसोबत काम करणे, माझ्यासाठी सर्वात सुखद अनुभव राहिला आहे. कारण त्यांच्यासोबत काम करुन मला खूप आनंद आणि सकारात्म उर्जा मिळाली आहे. मी एका वर्षानंतर बंगाली सिनेमात काम केले आहे. माझ्यासाठी चांगला अनुभव होता. आशा आहे की प्रेक्षकाना आमचे काम आवडेल. अरित्रा मुखर्दी यांनी बाबा बेबी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका सिंगल फादरवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. जुळ्या मुलांचे संगोपन, आयुष्यातील चढउतार आणि संघर्ष या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतच पूर्ण झाले आहे.


- Advertisement -

हे वाचा-  OTT क्विन रसिका दुग्गलची, या प्रसिद्ध वेब सिरीजच्या पुढील सीझनही लागणार वर्णी

- Advertisement -