Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनJitendra Kumar : जीतू भैयाची सिरीज ‘बडा नाम करेंगे'मध्‍ये विशेष उपस्थिती

Jitendra Kumar : जीतू भैयाची सिरीज ‘बडा नाम करेंगे’मध्‍ये विशेष उपस्थिती

Subscribe

जीतू भैया म्‍हणून लोकप्रिय असलेले जितेंद्र कुमार सुरज हे आर. बडजात्‍या यांची सिरीज ‘बडा नाम करेंगे’मध्‍ये विशेष उपस्थिती दर्शवण्‍यास सज्‍ज आहेत. दिग्‍गज राजश्री प्रोडक्‍शन्‍ससोबत ते पहिल्‍यांदाच काम करत आहेत. या प्रोजेक्टमध्‍ये ते व दिग्‍दर्शक पलाश वासवानी एकत्र आले आहेत, ज्‍यांच्‍यासोबत जितू भैयाचे इंडस्‍ट्रीमधील सुरूवातीच्‍या दिवसांपासून दीर्घकालीन सर्जनशील नाते आहे. यापूर्वी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केले असल्‍याने त्‍यांच्‍यामधील नात्‍याला नवीन वळण मिळाले आहे, जेथे दोघेही राजश्री प्रोडक्‍शन्‍ससोबत सहयोग करत आहेत. त्‍यांचे संयुक्‍त यश ‘बडा नाम करेंगे’मधील त्‍यांच्‍या सहयोगाला अधिक विशेष बनवते’. (Jitendra Kumar playing important role in ott play bada naam karenge)

जितेंद्र कुमार म्‍हणाले, ‘मला सिरीज ‘बडा नाम करेंगे’चा भाग असण्‍याचा आनंद होत आहे आणि या सिरीजसाठी माझी निवड करण्‍याकरिता मी राजश्री प्रोडेक्‍शन्‍सचे आभार व्‍यक्‍त करतो. पलाश वासवानीसोबत काम करण्‍याचा अनुभव आनंददायी राहिला आहे. आम्‍ही इंडस्‍ट्रीमध्‍ये सुरूवातीच्‍या दिवसांपासून एकमेकांना ओळखतो आणि यावेळी राजश्री प्रोडक्‍शन्‍ससोबत आम्‍ही पुन्‍हा एकत्र आलो आहोत, ज्‍यामुळे जुन्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या आहेत. मी आशा करतो की, ही सिरीज कालातीत प्रेमामधील सखोलतेला सादर करेल आणि प्रेक्षकांमध्‍ये कुटुंबाप्रती प्रेम व आपुलकीची भावना जागृत करेल’.

दिग्‍दर्शक पलाश वासवानी उत्‍साहित होत म्‍हणाले, ‘सिरीज बडा नाम करेंगेमध्‍ये जितेंद्रची छोटीसी भूमिका प्रेक्षकांसाठी अद्भुत सरप्राइज आहे. आम्‍ही गतकाळात एकत्र काम करताना खूप धमाल केली आहे आणि या प्रोजेक्टसाठी त्‍याची निवड होणे आनंददायी आहे. त्‍याची ऊर्जा, दर्जा व टॅलेंट निश्चितच कथानकाला रोमांचक वळण देईल’.

हृदयस्‍पर्शी प्रेमगाथा ‘बडा नाम करेंगे’ 7 फेब्रुवारी रोजी सोनी लिव्‍हवर प्रसारित होत आहे. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत, जसे रितिक घनशानी, आयेशा कोडुस्‍कर, कंवलजीत सिंग, अल्‍का आमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, दीपिका आमिन, जमीन खान, राजेश तैलंग, अंजना सुखानी, साधिका सयाल, गजेंद्र त्रिपाठी, प्रियमवदा कांत, ओम दुबे आणि भावेश बबानी. प्रेम व आपुलकीचा हा संस्‍मरणीय प्रवास पाहायला विसरू नका; पहा ‘बडा नाम करेंगे’ 7 फेब्रुवारीपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर!

हेही पहा –

Swapnil Joshi : महाकुंभमध्ये स्वप्नील जोशीने केलं पवित्र स्नान, Insta वर शेअर केला दिव्य अनुभव