घरमनोरंजनभाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी मालिका 'जिवाची होतिया काहिली'

भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी मालिका ‘जिवाची होतिया काहिली’

Subscribe

सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादांनी हिंसक वळण घेतले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादासाठी कर्नाटक समर्थकांनी आंदोलन केले. राज्याराज्यांत अशा प्रकारचे वातावरण निर्माण होणे योग्य नाही. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या दूरचित्रवाणीवर सुरू असलेली ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांच्या आवडतो आहे.

मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जिवाची होतिया काहिली’ या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे.

- Advertisement -

मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. अर्जुन आणि रेवथी यांची ही प्रेमकहाणी वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. सध्या अर्जुन आणि रेवती यांच्यात मैत्री झाली असून, या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. घरच्यांपासून लपूनछपून ही प्रेमकहाणी सुरू आहे. ती आता कोणते वळण घेईल, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.


हेही वाचा :

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये पृथ्वीराज सुकुमारन साकारणार खलनायकाची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -