हॉलीवूडस्टार जॉनी डेप करणार ‘मोदी’ सिनेमाचं दिग्दर्शन

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या तो 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटाचे दिग्दर्शक करण्यासाठी सज्ज झाला आहे. जॉनी डेपने त्याच्या आगामी ‘मोदी’ चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केली असून तो या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. याआधी, अभिनेता “जीन डू बॅरी” मध्ये दिसणार आहे, ज्याचा कान्समध्ये प्रीमियर होईल. जॉनी डेपने खुलासा केला आहे की तो ‘मोदी’ चित्रपटामध्ये इटालियन कलाकार अमेदेओ मोदीग्लियानीची कथा सांगणार आहे.

हे कलाकार दिसणार चित्रपटात

 

View this post on Instagram

 

A post shared by Dior Beauty Official (@diorbeauty)

जॉनी डेप दिग्दर्शित, यात चित्रकार आणि शिल्पकार मोडिग्लियानी यांचा पॅरिसमधील 1916 मधील काळ दर्शविला जाईल. हा चित्रपट डेनिस मॅकइन्टायर यांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित आहे. ‘जॉन विक: चॅप्टर 2’, ‘द बेस्ट ऑफ यूथ’ आणि पाओलो सोरेंटिनोच्या ‘लोरो’ मधील भूमिकांसाठी ओळखला जाणारा इटालियन स्टार रिकार्डो स्कामार्सिओ देखील ‘मोदी’मध्ये दिसणार आहे . पियरे नैनी आणि दिग्गज अभिनेता अल पचिनो यांनाही या चित्रपटासाठी सामील करण्यात आले आहे. ‘मोदी’चे शूटिंग बुडापेस्टमध्ये होणार आहे.

जॉनी डेप 25 वर्षांनी करणार चित्रपटाचं दिग्दर्शन

जॉनी डेपने 1997 मध्ये द ब्रेव्ह या चित्रपटाचं शेवटचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात डेप आणि मार्लन ब्रँडो यांनी अभिनय केला होता. डेप त्याच्या कमबॅक चित्रपट ‘जीन डू बॅरी’ च्या वर्ल्ड प्रीमियरची तयारी करत आहे.

 


हेही वाचा :

मनोज वाजपेयी 14 वर्षांपासून रात्री उपाशी झोपतोय