सुरु होतोय बयोचा ‘श्यामची आई’ होण्याचा प्रवास

मराठी वरील प्रेक्षकांची सर्वात लाडकी मालिका ‘यशोदा- श्यामची आई ‘ आता एक नवीन वळण घेणार आहे. अवखळ अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे.

प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार व तिचा नवीन जन्म होणार आहे.सदाशिवराव साने ह्यांचा बरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरु होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा सम्पन्न होणार आहे. तर लग्नाला यायला विसरू नका 16 मे रोजी, संध्या. 6 वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.


हेही वाचा :

आजच्या जोडप्यांमध्ये संयम… दीपिकाने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य