TKSS: आलिया भट्टच्या झिरो फिगरवर JR NTR ची कमेंट, म्हणाला…

आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि ज्युनिअर एनटीआरने (JR NTR) रामचरण ( Ramcharan )  यावेळी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मामध्ये हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली देखील उपस्थित होते.

JR NTR comment on Alia Bhatt Zero Figure in kapil sharma show
TKSS: आलिया भट्टच्या झिरो साइजवर JR NTR ची कमेंट, म्हणाला...

प्रेक्षकांचा लडका शो म्हणजेच द कपिल शर्मा शोमध्ये (TKSS)  अनेक सेलिब्रेटी सिनेमांच्या प्रमोशनसाठी येत असतात. RRR या सिनेमानिमित्त सिनेमातील काही कलाकार कपिल शर्माच्या सेटवर आले होते. RRR मध्ये बॉलिवूड कलाकार देखीलआहे. आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि ज्युनिअर एनटीआरने (JR NTR) रामचरण ( Ramcharan )  यावेळी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मामध्ये हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली देखील उपस्थित होते. शो मध्ये कपिल शर्माने नेहमीप्रमाणेच कलाकारांना तूफान हसवले. सर्वांनी संपूर्ण एपिसोडमध्ये कल्ला केला.

RRR मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि आलिया भट्ट यांची जबदरस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मात्र त्याआधीच ज्युनिअर एनटीआर आणि आलिया यांची केमिस्ट्री कपिल शर्माच्या शोमध्ये पहायला मिळाली. आलियाच्या झिरो फिगरची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा असते. मात्र आलिया झिरो फिगर ज्युनिअर एनटीआरने देखील दखल घेतलीय आलियाच्या झिरो साइजवर ज्युनिअर एनटीआरने चांगलीच फिरकी घेतली.

एपिसोड दरम्यान आलिया कपिलला सांगते ज्युनिअर एनटीआर फार चांगला कूक आहे. पण त्याने त्याच्या हातच कधीच आम्हाला खाऊ घातलेले नाही. त्याला काहीतरी खायला बनवायला सांगा. त्यावर एनटीआर कपिलला सांगतो सर ‘आलियाला साइज झिरो ठेवायाची आहे मग मी तिला कसा खायला देऊ’. यावर संपूर्ण शोमधील सगळे कलकार पोट धरुन हसले. यावर आलियाने मजेशीर उत्तर दिले की ‘विचारले तरी मी खायला देणार नाही’ असे म्हणते.

एसएस राजमौली यांचा RRR हा सिनेमा येत्या ७ जानेवारीला रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे.


हेही वाचा – RRR Postponed: कोरोनामुळे आरआरआरच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली