‘जुग जुग जियो’ ठरला बॉलिवूडमधील कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट

या चित्रपटाने शुक्रवारी ९.२८ कोटी कमावले होते. तसेच शनिवारी चित्रपटाने १२.५५ कोटी रूपये कमावले होते. तिसऱ्या दिवशी १५.१० कोटी रूपये कमावले

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन, कियारा अडवाणी,अनिल कपूर आणि नीतू कपूर यांचा ‘जुग जुग जियो’ चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करायला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ३६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२८ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२.५५ कोटींची कमाई केली होती.

‘जुग जुग जियो’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

तरण आदर्शने वरूण धवन आणि कियारा अडवाणीच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची कमाई आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी ९.२८ कोटी कमावले होते. तसेच शनिवारी चित्रपटाने १२.५५ कोटी रूपये कमावले होते. तिसऱ्या दिवशी १५.१० कोटी रूपये कमावले होते.तसेच या चित्रपटाने विकेंडच्या शेवटपर्यंत ३६.९३ कोटींची कमाई केली आहे.

‘जुग जुग जियो’ ठरला बॉलिवूडमधील कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट
वरूण धवन आणि कियारा अडवाणीच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाने आत्तापर्यंत जवळपास ३६.९३ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच ‘जुग जुग जियो’ बॉलिवूडमधील कमी वेळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट चौथा चित्रपट ठरला आहे. या आधी ‘भूल भुलैया २’ ने तीन दिवसात ५५.९६ कोटींची कमाई केली होती. तसेच ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली होती आणि ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटाने ३९.१२ कोटींची कमाई केली होती.

 


हेही वाचा :केतकी चितळेला दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश