९० च्या दशकातील अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. तिने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज जुहीचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. तिने १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकला होता.
अभिनेत्री जुही चावला ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहीली आहे. जुहीचा परखड अंदाज तिला अनेकदा वादाच्या भोवऱ्यात घेऊन जातो. आता जुहीनं आमिरच्या स्वस्तातल्या गिफ्ट देण्याविषयी सांगितलं आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
जुही चावलाने सांगितला प्रँकचा किस्सा
यावेळी जुहीनं आमिर आणि अजयच्या त्या प्रँकविषयी देखील काही किस्से शेयर केले. ती म्हणजे आमिर आणि अजय हे दोघेही सेटवर सर्वाधिक खट्याळपणा करणारे अभिनेते आहे. या तिघांनी इश्क नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते. तो चित्रपट लोकप्रिय झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. इश्कच्या सेटवर अजय आणि आमिरनं अनेक प्रँक केल्याचे जुहीनं त्या मुलाखतीत सांगितले.
इश्कच्या सेटवर एक नवीन असिस्टंट दिग्दर्शक आला होता. तो जेव्हा क्लॅप करायचा तेव्हा आमिर आणि अजय त्याला छे़डायचे. त्यामुळे तो बोर्ड हालायचा आणि दिग्दर्शक वैतागयचे. पण त्यांना हे माहिती नव्हतं की हे कोण करतं म्हणून…
जुही ही सध्या डान्स रियालिटी शो “झलक दिखला जा” ११ व्या सीझनमध्ये आली होती. हा एपिसोड “जश्न जुही का” यासाठी स्पेशल होता. यावेळी स्पर्धकांनी जुहीच्या गाण्यावर परफॉर्मन्स दिले. त्यात जुहीनं तिच्या बॉलीवूडमधील काही आठवणींना उजाळा दिला.
View this post on Instagram
त्या शो मध्ये फराह खान जुहीला विचारते की, इंडस्ट्रीत तुला कुणी सगळ्यात स्वस्तातले गिफ्ट दिले आहे का, त्यावर जुहीनं आमिरचे नाव घेतले. ती म्हणाली, मला आमिर खाननं स्वस्तातलं गिफ्ट दिलं होतं. त्यावेळी आम्ही नुकतेच स्टार्स झालो होतो. माझा बर्थ डे होता आणि आमिरचा मला फोन आला की, आम्ही घरी येत आहोत. त्यानं घरी येऊन मला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला एक चॉकलेट देत म्हणाला की हे माझ्याकडून खास गिफ्ट.
आमिर-जुहीनं कोणत्या चित्रपटात केलं काम
१९८४ मध्ये मिस इंडियाचा खिताब नावावर केल्यानंतर जुहीने अमिर खानसोबत सल्तनत नावाची फिल्म केली होती. त्यानंतर कयामत से कयामत तक नावाची फिल्म केली. त्यातून जुहीच्या नावाची लोकप्रियता वाढली. तसेच आमिर आणि जुही हम है राही प्यार के, दौलत की जंग, लव लव लव आणि इश्क सारख्या चित्रपटांतून काम केले.