‘फ्राईड नाइट प्लान’ वेब सीरिजमध्ये जुही चावला साकारणार मुख्य भूमिका

जूहीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक गिफ्ट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक वेलकम कार्ड दिसत आहे.जे या वेब सीरीजच्या निर्मात्यांनी जूही चावलाला पाठवले आहे

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला लवकरच अभिनेता फरान अख्तरच्या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. ‘फ्राईड नाइट प्लान’ असं या वेब सीरिजचे नाव असून या सीरिजबाबतची बातमी जूही चावलाने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटला शेअर केली आहे. या ट्विटर अकाउंटवरील पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक गिफ्ट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक वेलकम कार्ड दिसत आहे.जे या वेब सीरीजच्या निर्मात्यांनी जुही चावलाला पाठवले आहे.

निर्मात्यांनी वेलकम नोटवर लिहिले आहे की, “जुही, आम्ही तुम्हाला ‘फ्राईड नाइट प्लान’मध्ये सहभागी करण्यासाठी खूप उत्सुक आहोत आणि त्यासोबतच शूटिंग सुरू करण्यासाठी देखील खूप आनंदी आहोत”. या व्हिडीओ शेअर करून जुही चावलाने फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीचे आभार व्यक्त केले आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “इतक्या खास पद्धतीने स्वागत करण्यासाठी रितेश आणि फरहान तुमचे धन्यवाद. लवकरच भेटू”.

जुही चावलाची ही वेबसीरीज एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली तयार करण्यात येणार आहे. या वेबसीरीजचे शूटिंग गेल्या एक महिन्यापासून चालू झाले आहे. अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुही चावला ‘फ्राईड नाइट प्लान’मध्ये दिसणार असून याआधी जुही २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषि कपूर च्या ‘शर्मा जी नमकीन’ चित्रपटामध्ये दिसली होती. जूही चावलाला बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी मानले जाते. जूही चावलाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. स्वर्ग, प्रतिबंध, बोल राधा बोल, राजू बन गया जेंटलमॅन, लुटेरे, हम है राही प्यार के यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये जूहीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 


हेही वाचा :कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने केली करोडोंची कमाई, तर अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ झाला फ्लॉप