HomeमनोरंजनJunaid Khan : आमीरच्या एक्स पत्नींसाठी केलेल्या विधानाचा जुनैदला होतोय पश्चाताप

Junaid Khan : आमीरच्या एक्स पत्नींसाठी केलेल्या विधानाचा जुनैदला होतोय पश्चाताप

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान सध्या त्याच्या आगामी सिनेमा ‘लव्हयापा’मूळे चर्चेत आहे. या सिनेमात जुनैदसोबत श्रीदेवीची लेक ख़ुशी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून सध्या त्याचे प्रमोशन अगदी जोरदार सुरू आहे. अलीकडेच या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जुनैदने वडील आमीर खान आणि खुशीसोबत बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, आपल्या वडिलांच्या एक्स पत्नींबद्दल बोलताना त्याने असं काही म्हटलंय जे सध्या प्रचंड चर्चेत आहे. जे विधान केल्याची आता आपल्याला लाज वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. जाणून घेऊयात तो काय म्हणाला? (Junaid Khan regrets about the statement he made for Amir’s ex-wives)

काय म्हणाला जुनैद खान?

अभिनेता जुनैद खान आणि अभिनेत्री ख़ुशी कपूर यांनी ‘लव्हयापा’ सिनेमातील एक सीन बिग बॉसच्या मंचावर रिक्रिएट केला. ज्यात त्यांचे फोन एक्सचेंज होतात. पण यावेळी इथे एक ट्विस्ट होता. तो असा की, जुनैद आणि खुशीचे नव्हे तर आमीर आणि सलमानचे फोन एक्सचेंज करण्यात आले होते. यावेळी आमीर आपला फोन एक्सचेंज करायला लगेच तयार झाला. पण सलमान मात्र टाळाटाळ करत होता. मात्र एक्सचेंजनंतर सलमानचा फोन बघून आमीर विनोदाने म्हणाला, ‘अरे हिचा नंबर अजून सेव्ह आहे? अरे तिचा तर सकाळीच कॉल आला होता…’.

यानंतर सलमानने आमीरचा फोन घेतला आणि म्हणाला, ‘तुझी कुणी नवी गर्लफ्रेंड बनली का? अरे.. तुझ्या फोनमध्ये काय सापडणार?’ यावर आमीरचा मुलगा जुनैदने त्याच्या अंदाजात म्हटले, ‘दोन एक्स बायकांच्या शिव्या तुम्हाला वाचायला मिळतील’. जुनैदने हे विधान किरण राव आणि रीना दत्ता यांच्याबद्दल केले होते. ज्या आमीरपासून विभक्त झाल्या आहेत. या विधानाबाबत आता जुनैदला स्वतःचीच लाज वाटू लागली आहे.

मी नीट वागायला हवं होतं

जुनैदने केलेल्या वक्तव्याचा त्याला स्वतःला पश्चाताप वाटतोय, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले. आपल्या चुकीबद्दल बोलताना त्याने म्हटले, ‘मला वाटतं मी थोडा आउट ऑफ स्पेस झालो. ते दोघेही माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप सीनियर आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नीट वागायला हवं होतं. जे मी केलं नाही आणि याचा मला पश्चाताप आहे’.

‘लव्हयापा’ कधी रिलीज होणार?

अभिनेता जुनैद खान आणि ख़ुशी कपूर यांचा ‘लव्हयापा’ हा सिनेमा अद्वैत चंदनने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात दिग्गज अभिनेता आशुतोष राणादेखील महत्वाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीला जुनैद आणि ख़ुशी अशी नवी जोडी मिळाली आहे. यापूर्वी खुशी कपूरने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चीज’ या सिनेमात काम केले होते. हा तिचा पहिला सिनेमा होता. तर जुनैदने 14 जून 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हेही पहा –

Poonam Pandey : महाकुंभात पूनम पांडेने केलं अमृत स्नान, म्हणाली – माझी पापं धुवून गेली