Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनJunaid Khan : मिडल क्लास हिरो? लक्झरी गाडीऐवजी रिक्षाने फिरतो जुनैद खान

Junaid Khan : मिडल क्लास हिरो? लक्झरी गाडीऐवजी रिक्षाने फिरतो जुनैद खान

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद सध्या त्याच्या ‘लवयापा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून जुनैदने सिल्व्हर स्क्रीनवर पदार्पण केले. जुनैदसोबत बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर या सिनेमात झळकली असून सध्या ही जोडी चर्चेत आहे. दरम्यान, जुनैद खानच्या लाइफस्टाईलबाबत बरंच बोललं जातंय. त्याच झालं असं की, अलीकडेच जुनैद- खुशी सिनेमाच्या प्रमोशनसाठी फराह खानच्या यूट्यूब चॅनलवर दिसले होते. यावेळी जुनैद रिक्षातून प्रवास करतो असे समजले. याबद्दल तो आणखी काय म्हणाला ते जाणून घेऊया. (Junaid Khan travel by rickshaw like a common man)

मिडल क्लास लाईफ जगतोय जुनैद खान

जुनैद आणि खुशी आयते हाताला लागले असताना फराह खानने तिच्या विनोदी अंदाजात त्यांना विचारलं, ‘तुम्ही बॅगेत काय काय ठेवता?’ यावर खुशीने जुनैदच्या बॅगेतून पेन काढला. हा पेन त्याने जपानमधील सेव्हन इलेवन स्टोरतून खरेदी केलेला. त्यानंतर खुशीने जुनैदच्या बॅगेतून हेअर ड्रायर काढला. ज्याबद्दल जुनैद म्हणाला, ‘मी स्वतः माझे केस सेट करतो. त्यामुळे मला बहुतेकदा त्याची गरज वाटते.’ यानंतर जुनैदच्या बॅगेतून रेझर, हेयरवॅक्स आणि पाकीट मिळालं. जे जुनैदचं पाकीट पाहताच फराह चकित झाली.

याचे कारण म्हणजे, जुनैदचे वडील आमीर खान कधीच पाकीट घेऊन फिरत नाही. पैसे द्यायला त्याने माणसं नेमली आहेत. तर त्याचा लेक स्वतःसोबत पाकिट घेऊन फिट. केवळ पाकीट नव्हे तर त्यामध्ये सुट्टे पैसेदेखील घेऊन फिरतो. फराहने म्हटले, ‘वडील असताना पाकीटात पैसे ठेवतोस?’ यावर जुनैद म्हणाला, ‘रिक्षासाठी लागतात. म्हणून मी कायम सुट्टे पैसे घेऊन फिरतो’.

जुनैद लक्झरी गाडीऐवजी रिक्षाने प्रवास करतो

जुनैद म्हणाला, ‘रिक्षाने प्रवास करणं फार सोयीचं असतं. साहजिक आहे कधी अगदीच गरज असेल तर मी घरातील गाड्यांचा वापर करु शकतो’. तर यावर खुशी म्हणाली, ‘असाच असतो आपला मिडल क्लास हीरो..’. सोशल मीडियावर जुनैदच्या सामान्य लाइफस्टाईलचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, जुनैद आणि खुशी यांच्या ‘लवयापा’ सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामध्ये ग्रुशा कपूर, आशुतोष राणा, तनविका पार्लीकर, देवीशी मदान, आदित्य कुलश्रेष्ठ, निखिल मेहता, जेसन थाम, यूनुस खान, युक्तम खोसला आणि कुंज या कलाकारांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.

हेही पहा –

Sudha Chandran : अपघातात 17 व्या वर्षी गमावला पाय अन् बदललं सुधा चंद्रनचं आयुष्य