घरमनोरंजनJunior Mehmood :अभिनयाच्या सुरुवातीलाच गाजवलं होतं गाणं

Junior Mehmood :अभिनयाच्या सुरुवातीलाच गाजवलं होतं गाणं

Subscribe

हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं या गाण्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झालेले ज्युनियर महमूद आता मृत्यूशी झुंज देत आहेत.त्यांना पोटाचा कर्करोग झाला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.अलीकडेच दिग्गज कॉमेडियन जॉनी लीव्हरने त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

कला माणसाला जिवंत ठेवते आणि याच कलेमुळे अनेक कलाकार नेहमी ओळखले जातात.ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते ज्युनियर महमूद सुद्धा याच कलाकारांपैकी एक आहेत. स्वतःच्या अभिनयाच्या आणि विनोदाच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळा नावलौकिक मिळवला आहे. हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं या गाण्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झालेले ज्युनियर महमूद आता मृत्यूशी झुंज देत आहेत .

हेही वाचा :रणबीर राम तर साऊथ अभिनेत्री सीतेच्या भूमिकेत

- Advertisement -

त्यांना पोटाचा कर्करोग झाला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.अलीकडेच दिग्गज कॉमेडियन जॉनी लीव्हरने त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.सध्या ज्युनियर महमूद हे 67 वर्षांचे आहेत.या व्हिडिओमध्ये ते खूपच कमजोर आणि नाजूक दिसत आहेत.

ज्युनियर महमूदच्या पोटातून लवकरच शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर काढला जाणार असल्याची चर्चा असली तरी कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर आता ते आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पण या व्हिडिओमध्ये ते सकारात्मक हावभाव करताना दिसत आहेत.सलाम काझी यांनी एका मुलाखतीत ‘ज्युनियर मेहमूदला पोटाचा कर्करोग आहे. त्यांचा रक्तदाब आणि साखरेचा दाब वाढल्याने त्याचे वजन सुमारे २० किलोने कमी झाले आहे. पण तरीही चांगला प्रतिसाद देत आहेत.’ असं सांगितले आहे.

- Advertisement -

ज्युनियर महमूदच यांचे खरे नाव नईम सय्यद आहे. ज्युनियर महमूद हे नाव त्यांना खुद्द प्रसिद्ध कॉमेडियन महमूद अली यांनी दिले होते.बालकलाकार म्हणून ज्युनियर महमूदने करिअरची सुरुवात केली होती.मेरा नाम जोकर, ब्रह्मचारी, दो और दो पांच आणि परवरिश या चित्रपटांमध्ये दिसले होते.मराठी चित्रपटांचे सुद्धा त्यांनी दिग्दर्शन केले आहे.ज्युनियर महमूद यांच्यासारखे कलाकार म्हणजे चित्रपटसृष्टीला एक दैवी देणगीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -