जस्टिन बिबर करणार भारतात परफॉर्मन्स; ‘या’ दिवशी होणार कॉन्सर्ट

सध्या वर्ल्ड टूरवर असलेला सुप्रसिद्ध कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर या वर्षी तब्बल ५ वर्षानंतर भारतात परफॉर्म करणार आहे. या वर्षी १८ ऑक्टोबर रोजी जस्टिन बीबर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जस्टिनचा हा कॉन्सर्ट होणार आहे. ‘बुकमाईशो’ आणि ‘एईजी प्रेजेंट्स एशिया’ या द्वारे चाहते जस्टिनच्या शोची तिकिटे खरेदी करू शकतील.

अर्धा तास करणार परफॉर्म

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

जस्टिन बीबर या वर्ल्ड टूर दरम्यान भारतासह इतर अनेक देशांमध्ये शो करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जस्टिन बीबर ३० देशांमध्ये १२५ हून अधिक शो करणार आहे. जस्टिन बीबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत हा दौरा पूर्ण करणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी जस्टिन बीबर भारतातील दिल्ली येथे अर्धा तास परफॉर्मंस करणार आहे. यापूर्वी जस्टिन बीबर २०१६-२०१७ मध्ये वर्ल्ड टूरवर गेला होता.

२०१७ च्या कॉन्सर्ट दरम्यान झाला होता वाद
२०१७ मध्ये झालेल्या भारतातल्या कॉन्सर्टमध्ये तब्बल ४० हजार लोकांनी कॉन्सर्टची तिकिट खरेदी केली होती. त्यावेळी शोची तिकिटे खूप महाग होती. मात्र परफॉर्मंस दरम्यान जस्टिन बीबरने गाणं न गाता फक्त लिप सिंक केले असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्यानंतर जस्टिन बीबरला खूप ट्रोल देखील करण्यात आलं होतं. २०१७ मधील हा शो मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियममध्ये पार पडला होता.

 


हेही वाचा :‘धर्मवीर’ची 10 दिवसांत तब्बल 18.03 कोटींची कमाई