‘कागर’ चित्रपटाचे पहिले गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला

'कागर' चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नुकताच चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. तर या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

kaagar movie song lagliya godi tujhi rinku rajguru and shubhankar tawade hit on social media
'कागर'

‘सैराट’ चित्रपटीतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आणि घरा घरा पोहचलेली ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू एका नव्या चित्रपटात पुन्हा एकादा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कागर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. अलिकडेच ‘कागर’ या रिंकूच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तो टीझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. ती चर्चा चालू आहे. तर ‘कागर’ या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. रिंकू आणि शुभांकर तावडे यांची लवस्टोरी दाखवणारा हे गाणे आहे. ‘लागलीया गोडी तुझी’ असे या गाण्याचे नाव आहे. सोशल मीडियावर हे गाण हिट ठरले आहे. तर युट्यूबवर या गाण्याला लक्षावधीमध्ये व्हूज मिळाले आहेत. ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी ‘कागर’ चित्रपटातील ‘लागलीया गोडी तुझी’ हे रोमॅण्टिक गाणे शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे. शशा तिरूपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणे गायले आहे.

‘कागर’ चित्रपटाबद्दल थोडेसे

रिंकू राजगुरूचा ‘सैराट’ हा पहिलाच चित्रपट होता. रिंकूचा पहिलाच चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर नेहून पोचवले. ‘सैराट’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी रिंगूचा ‘कागर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘कागर’ चित्रपट १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्तांने प्रदर्शित होणार होता. मात्र, रिंकूच्या बारावीच्या परिक्षेमुळे हा चित्रपट पुढे धकलण्यात आला होता. ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या दोन चित्रपट केलेले राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. ‘सुधीर कोलते’ आणि ‘विकास हांडे’ यांच्या’ उदाहरणार्थ’ या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कागर हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.