घरमनोरंजनगूढ पोस्ट शेअर करत काजोलने नेटकऱ्यांवर साधला निशाणा

गूढ पोस्ट शेअर करत काजोलने नेटकऱ्यांवर साधला निशाणा

Subscribe

अभिनेत्री काजोल सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी काजोलचा सलाम वेंकी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. काजोल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच नुकतीच काजोल एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने कोणाचेही नाव न घेता भ्याड, बेकार अशा शब्दांचा वापर केला आहे.

काजोलची पोस्ट चर्चेत

- Advertisement -

नुकत्याच काही तासांपूर्वी काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यात तिने लिहिलं होत की, “दोन्ही जेंडर भित्री आहेत. ट्रिक अशी आहे की, आपल्याला त्यांच्या जेंडरकडे पाहून डोळे बंद करायचे नाहीत आणि हे ठरवायचे नाही की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट”. या शिवाय तिने आणखी एका पोस्टमध्ये लिहिलंय की, “गुडबाय त्यांच्यासाठी असते जे आपल्या डोळ्यांनी प्रेम करतात जे लोक हृदय आणि आत्म्याने प्रेम करतात. त्यांच्यासाठी वेगळे होणे म्हणजे काहीच नाही.” असं काजोलने लिहिलं आहे.

दरम्यान, काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 14 मिलियन फॉलोअर्स आहेत.

- Advertisement -

‘द गुड वाईफ’ वेबसीरिजमध्ये दिसणार काजोल

काजोल लवकरच ‘द गुड वाईफ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. हे त्याच नावाच्या अमेरिकन कोर्टरूम ड्रामावर आधारित आहे. या शोमध्ये काजोल एका वकिलाची भूमिका साकारत आहे, तसंच ती एका गृहिणीचीही भूमिका साकारत आहे. याचे दिग्दर्शन सुपन वर्मा यांनी केले आहे. हे फक्त डिस्ने प्लस हॉटस्टारवर सुरू होणार आहे.

 


हेही वाचा :

‘तू चीज बड़ी है…’ ब्लू टिक पुन्हा मिळाल्याच्या आनंदात अमिताभ बच्चन यांनी एलॉनसाठी गायले गाणं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -