कालीमातेच्या तोंडात सिगारेट तर हातात LGBT चा झेंडा; पोस्टर पाहून युजर्स संतापले

या पोस्टर सोशल मीडियावर शेअर होताच नाव वाद सुरू झाला आहे. तसेच या पोस्टरवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. ज्या पोस्टर वरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याचं कारण म्हणजे वादात सापडलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर काली मातेचचा फोटो दिसत असून ती त्यात सिगारेट ओढताना दिसत आहे. खरंतर हा एक डॉक्युमेंट्री चित्रपट असून या चित्रपटाचे नाव ‘काली’ असं आहे. शिवाय इतकंच नाही तर या फोटोतील काली मातेच्या हातामध्ये LGBT चा झेंडा सुद्धा दिसत आहे.

या पोस्टर सोशल मीडियावर शेअर होताच नाव वाद सुरू झाला आहे. तसेच या पोस्टर अनेक विरोध देखील करण्यात येत आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा या पोस्टवर कारवाई करावी असी मागणी करत आहेत.

सोशल मीडियावर होतंय तीव्र निषेध


या पोस्टवरून सध्या सोशल मीडियावर अनेक क्षेत्रातील व्यक्तींकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरील युजर्स कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहेत त्यांपैकी एकाने लिहिलंय की, “प्रत्येक वेळी हिंदू धर्माची खिल्ली उडवली जाते. सरकार सुद्धा आमच्या परीक्षेची वाट पाहतयं का?” यापुढे त्याने गृहमंत्री अमित शाह, गृह मंत्रालय, पीएम ऑफिस आणि विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर यांना ही पोस्ट टॅग करत लिहिलं की, कृपया तुम्ही हे विसरू नका की धार्मिकांच्या यामुळे भावना दुखावल्या जातात, तुम्ही यावर लवकरात लवकर आवश्यक कारवाई करा.

दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “लाज वाटू द्या. काली मातेचं हे स्वरूप, जे तुम्ही दाखवलंय ते तुमचं आहे, काली मातेचं नाही”. तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “हा आमच्या आस्था आणि श्रद्धेचा अपमान आहे. यांना कठोर शिक्षा व्हायला हवी”. सध्या सोशल मीडिया युजर्स या फोटोचा तीव्र निषेध करत असून #ArrestLeenaManimekal असा हॅशटॅग अनेकजण वापरत आहेत.


हेही वाचा :कर्नाटकच्या सिनी शेट्टीने पटकावला ‘मिस इंडिया 2022’ होण्याचा मान