kamal haasan Covid Positive: कमल हासन यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

kamal haasan Covid Positive after returns from us isolated in hospital
kamal haasan Covid Positive: कमल हासन यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कमल हासन काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा करुन भारतात परतले होते. यावेळी त्यांना सौम्य खोकला येत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्य़ाचे स्पष्ट झाले आहे. सध्या कमल हासन आयसोलेशनमध्ये असून सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती शेअर केली आहे. विशेष म्हणजे कमल हासन यांचे लसीकरण पूर्ण झाले असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कमल हासन यांनी ट्विटरवरून ही माहिती शेअर केली आहे. या ट्वीटमध्य़े त्यांनी लिहिले आहे की, अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत असताना मला थोडा खोकला जाणवू लागला, त्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीत मला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. यावरून कोरोना महामारी अद्याप संपली नसल्याचे समोर आलेय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान कलम हासन यांच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तुम्ही लवकरचं बरे व्हाल अशी प्रार्थना केली आहे. कमल हासन जरी दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील स्टार असले तरी बॉलिवूड सिनेसृष्टीतही त्यांच्या अभिनयाची जादू आहे. हासन यांनी १९६० सालापासून अभिनय क्षेत्रात एंट्री घेतली. यात त्यांनी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘Varumayin Niram Sivappu’, ‘Saagar’, ‘Vishwaroopam’, ‘चाची 420’, ‘इंडियन’ अशा अनेक तेलुगू, तामिळ आणि बॉलिवूडमधील गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. कलम हासन एक अभिनेता तर आहेत पण ते एक राजकारणी देखील आहेत.

राजकारणी कमल हासन यांना काही दिवसांपूर्वी कोयंबतूर दक्षिण जागेवर निवडणूक लढवली, मात्र या निवडणूकीत त्यांना भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी पराभूत केले. या परभवामुळे तमिळनाडूमध्ये संत्तातर झाले असून आता डीएके युती सत्तेत आली आहे.