कमल हासन यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया, श्रुती हासनने ट्विट करत दिली माहिती

चेन्नई येथील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये झाली शस्त्रक्रिया

kamal haasan undergoes leg surgery at chennai hospital daughters say he is in good spirits
कमल हासन पायावर शस्त्रक्रिया यशस्वी

बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी कमल हासन यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. याविषयाची माहिती त्यांची मुलगी मुलगी अभिनेत्री श्रुती हासन व अक्षरा हासन या दोघांनी ट्विट करत दिली आहे. श्रृतीने वडीलांच्य यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती देत चाहत्यांचे आभार मानले आहे. याविषयी श्रृतीने ट्विट करत लिहिले, तुम्ही माझ्या वडीलांवरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पाठींबा देत व प्रार्थना केली, काळजी घेतली याबद्दल चाहत्यांचे धन्यवाद करु इच्छिते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती आपणा सर्वांना कळविण्यात आम्हाला आनंद होत आहे! ”असे तिने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच डॉक्टर व रुग्णालय व्यवस्थापन वडीलांची चांगली काळजी घेत आहेत. चार ते पाच दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल व काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा लोकांशी संवाद साधण्यास सज्ज असतील अशी माहिती श्रृती आणि अक्षराने दिली आहे. चेन्नई येथील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
पायाच्या हाडात इंन्फेक्शन झाल्याने त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, या दुखापतीमुळे पायाच्या हाडाला संसर्ग झाला होता. परंतु आता शस्त्रक्रिया करत तो संसर्ग दूर करण्यात आला आहे. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कमल हासन यांची पक्षांची जोरदार सुरु आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘बॅटरी’ आहे. परंतु ऐन निवडणुकांच्या तयारीत आजारपणामुळे हासन यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.