कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने केली करोडोंची कमाई, तर अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ झाला फ्लॉप

'सम्राट पृथ्वीराज' 3 जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याचं एक कारण म्हणजे 3 जून रोजीच प्रदर्शित झालेला मेजर आणि विक्रम चित्रपट

‘सम्राट पृथ्वीराज’ यांच्या जीवनावर आधारित ‘सम्राट पृथ्वीराज’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कधी सतत सापडणाऱ्या वादामुळे तक कधी इतर कारणांमुळे या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता.

मात्र 3 जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याचं एक कारण म्हणजे 3 जून रोजीच प्रदर्शित झालेला मेजर आणि विक्रम चित्रपट, या दोन्ही चित्रपटांमुळे ‘सम्राट पृथ्वीराज’ला बॉक्स ऑफिसवर मोठ्ठा चटका बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ 55 कोटींची कमाई केली आहे.

  • विक्रम

मात्र याउलट कमल हासन, विजय सेतुपति आणि फहद फासिल यांच्या लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘विक्रम’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करत आहे. याचं दरम्यान ‘विक्रम’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी संपूर्ण जगभरातून 200 कोटींची कमाई केली आहे.

कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटाला तमिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमधून जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मात्र हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केलेली दिसून येत नाही. या बॉक्स ऑफिसच्या वाढत्या आकड्यांबद्दल माहिती देत रमेश बोला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर माहिती शेअर केली आहे.

  •  मेजर

 टॉलिवूड अभिनेता महेश बाबूच्या प्रोडक्शन खाली तयार झालेला अभिनेता आदिष शेष आणि सई मांजरेकर यांचा ‘मेजर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत जवळपास संपूर्ण जगभरातून 40.36 कोटींची कमाई केलेली आहे.

 

 


हेही वाचा :‘बॉस माझी लाडाची’ मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी यांच्या लग्नाची सनई वाजणार!