एलोन मस्कच्या ट्वीटवरुन कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये तिच्या ‘इमर्जन्सी’, ‘चंद्रमुखी 2’, ‘तेजस’ आणि ‘टिकू वेड्स शेरू’ या बहुप्रतिक्षित चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, कंगनाने ट्विटरचे नवे प्रमुख आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांचे एक ट्वीट तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहे.

एलोन मस्क यांनी रविवारी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक मॉर्फ केलेला फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ट्वीटरचे माजी प्रमुख जॅक डोर्सी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे चेहरे दिसत आहेत. या फोटोवर ‘जस्ट वन मोअर लॉकडाउन माय किंग’ असे लिहिले आहे.

 दरअसल, एलन मास्ट ने रविवार को अपने ट्विटर अकाउंट पर एक मॉर्फ्ड तस्वीर शेयर की, जिसमें पुराने ट्विटर प्रमुख जैक डोरसी और अमेरिकी राष्ट्रपति जो बाइडन की चेहरा नजर आ रहा है. इस तस्वीर पर लिखा है, 'जस्ट वन मोर लॉकडाउन माई किंग'. (फोटो साभारः Twitter @elonmusk)

कंगनाने हाच फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला असून त्यावर तिने लिहिलंय की, “सत्ताधारी सरकारच्या विरोधात ऍलन एकटा उभा आहे, पण त्याला व्हॉक्सकडून कोणताही पाठिंबा मिळत नाही, व्हॉक्स तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की ते बंडखोर आहेत, जे राज्याविरुद्ध त्यांच्या लढ्यामध्ये एखाद्या व्यक्तीला समर्थन देतात.”

कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

 एलन के इसी ट्वीट के एक प्रिंटशॉट को कंगना ने अपने इंस्टाग्राम के स्टोरी सेक्शन में पोस्ट किया. (फोटो साभारः Instagram @kanganaranaut)
एलोन मस्कच्या ट्वीटच्या माध्यमातून कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तिने पुढे लिहिलं की, “जेव्हा मी शिवसेनेविरुद्ध लढा देत होते, तेव्हा त्यांनी माझे घर बेकायदेशीर रित्या पाडून त्याचा आनंद साजरा केला, व्हॉक्स प्रत्येक जागी एकच मूर्ख आहे.”

दरम्यान, कंगना अनेकदा आपल्या प्रतिक्रिया परखडपणे मांडत असते. अनेक वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा तिचे ट्वीटर अकाऊंट देखील सस्पेंड करण्यात आलं आहे.

 


हेही वाचा :

भारतामध्ये ‘अवतार 2’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक; 4 लाखांपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग