Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन तुटलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यास कंगना पोहचली मुंबईत

तुटलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यास कंगना पोहचली मुंबईत

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रानौतला मुंबईमध्ये असणार्‍या पाली हिल स्थित ऑफिसच्या बाहेर स्पॉट करण्यात आले आहे. कंगना ऑफिसची पहाणी करण्यास आली असल्याचे दिसतेय. गेल्याकाही महिन्यांपूर्वी बीएमसीने केलेल्या कारवाई अंतर्गत कंगणाचे कार्यालय अवैध बांधकामाअंतर्गत तोडण्यात आले होते. त्यांनातर कंगणाने राज्य सरकारवर तसेच बीएमसीवर चांगलीच संतापली होती.महितीनुसार कंगना सध्या तिच्या कार्यालयाचे झालेल्या नुकसानाची पडताळणी करण्यास पाली हिलमध्ये दाखल झाली आहे. यादरम्यान ऑफिस बाहेर उभ्या असणार्‍या पॅपराझीने तिला घेरले. कंगनाने “मला माझ काम करुद्या’ असे म्हणत तिथून पळ काढला. पण नंतर कंगनाने मीडिया समोर येऊन काही फोटो काढले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

का तोडण्यात आलं कंगनाचं कार्यालय
- Advertisement -

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगना रानौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमक सुरू झाली होती. मुंबई तसंच मुंबई पोलिसांविरुद्ध चुकीचे वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला संजय राऊत यांनी कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं मुंबईत येत असल्याचं सांगत शिवसेनेला आव्हान दिलं होतं.
या शाब्दिक वॉर दरम्यान कंगना हिमाचल प्रदेशमध्ये तिझ्या घरी होती आणि यावेळेसच कंगना मुंबईत दाखल होण्याच्या आधीच मुंबई महानगरपालिकेनं बेकायदेशीर बांधकामाचा ठपका ठेवत कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयावर कारवाई करत कार्यालयाची तोडफोड केली


हे हि वाचा – PearlVPuriCase:निया-देवोलिनामध्ये ट्विटरवर रंगली कॅट फाईट

- Advertisement -