घर मनोरंजन पारंपरिक हेडपीसला 'ताज' म्हटल्याबद्दल कंगना ट्रोलर्सवर संतापली

पारंपरिक हेडपीसला ‘ताज’ म्हटल्याबद्दल कंगना ट्रोलर्सवर संतापली

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगना आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातबाबत अनेक नवीन अपडेट शेअर करत असते. याव्यतिरिक्त कंगना तिचे नवनवीन फोटो देखील शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंगनाने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले होते.

- Advertisement -

या फोटोंमध्ये तिने हिमाचल प्रदेशातील परंपरेशी निगडीत दागिने परिधान केले होते. कंगनाने सुंदर हेडपीससह रंगीबेरंगी लेहेंगा परिधान केला होता, ज्याला लोकांनी ‘ताज’ समजले आणि तिला ट्रोल करु लागले. यामुळे कंगना संतप्त झाली आणि पारंपारिक भारतीय हेडपीसला ताज म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

 

- Advertisement -

कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पंजाबी महिला सग्गी फुले परिधान करताना दिसत आहेत. यासोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले – “पंजाबमधील पारंपारिक सग्गी फुले.”

त्यानंतर दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने हिमाचलमधील महिलांचे ‘चक’ हेडपीस घातलेले आणखी एक फोटो शेअर केले. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की – “हिमाचलमध्ये वेगळे हेडगियर.”

‘या’ चित्रपटात दिसणार कंगना

कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे . हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवाय ती ‘चंद्रमुखी 2’ मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

Photo : मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदींनी केले होते 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम

- Advertisment -