इतक्या शालीनतेने… बॉलिवूडवर टीका करणाऱ्या कंगनाने केलं दीपिका पादुकोणचं कौतुक

95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचा ध्वजा अभिमानाने फडकला. या पुरस्कार सोहळ्यात सगळीकडे RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याचीच चर्चा सुरु होती. या गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवाय दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावून भारताचं प्रतिनिधित्व केलं. या सोहळ्यात दीपिकाने देखील नाटू नाटू गाण्याचे प्रचंड कौतुक केले. अशातच, आता अभिनेत्री कंगना रनौतने दीपिकासाठी एक ट्वीट शेअर केलंय. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनाने केलं दीपिकाचं कौतुक

 

 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांवर जबरदस्त टीका करताना दिसते. मात्र, आज चक्क कंगनाने दीपिकाचं कौतुक केलं आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “किती सुंदर आहे दीपिका पादुकोण पूर्ण देशाला एकत्र घेऊन उभं राहणं. आपली प्रतिमा, प्रतिष्ठा त्या नाजूक खांद्यांवर घेऊन जाणं आणि इतक्या शालीनेतेने आणि आत्मविश्वासाने बोलणं सोप्प नाही. दीपिकाने भारतीय महिला सर्वोत्तम असण्याचा पुरावा दिला आहे.” असं म्हणत कंगनाने दीपिकाचं कौतुक केलं आहे. कंगनाने दीपिकाचं केलेलं हे कौतुक पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, कंगनाने ऑस्कर पुरस्कार मिळवल्याबद्दल RRR चित्रपटाच्या टीमचे देखील कौतुक केले आहे.

 


हेही  वाचा :

‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळताच बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव