घरमनोरंजनकंगना करणार राजकारणात एंट्री ?, थलायवी सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान केला खुलासा

कंगना करणार राजकारणात एंट्री ?, थलायवी सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान केला खुलासा

Subscribe

देशभक्तासारखे बोलल्या बद्दल तिला कशाप्रकारे मोठी किंमत मोजावी लागली होती. तसेच यामुळे तिला अनेक प्रोजेक्ट गमवावे लागले.

बॉलिवूडची (bollywood)पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रनौतचा (kangana ranaut)’थलायवी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.(Thalaivii movie) चित्रपट समीक्षकांकडून चांगले रेटींग आणि प्रशंसा मिळवूनही ‘थलायवी’ बॉक्स ऑफीसवर गल्ला जमवण्यात अयशस्वी ठरल आहे.थलायवी सिनेमात कंगनाने तमिळनाडूमधील प्रख्यात राजकारणी जे.जे. जयललिता यांची भूमिका साकारली. सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगनाने अलीकडेच एका यूट्यूब चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.(kangana ranaut join politics know what did actress said)

या दरम्यान, जेव्हा कंगनाला विचारण्यात आले की कंगना राजकारणात एंट्री करणार का, तेव्हा कंगनाने उत्तर दिले की सध्या मी अशा प्रकारचा कोणताही विचार किंवा योजना केली नाहीये. माझा असा विश्वास आहे की तळागाळात काम केल्याशिवाय कोणतीही ग्रामपंचायत निवडणूक देखील जिंकू शकत नाही.

- Advertisement -

यासोबतच कंगना पुढे म्हणाली की ,लोक तुमच्याद्वारे पाहू शकतात, राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला लोकांसोबत वेळ घालवावा लागेल आणि त्यांच्यासाठी काम करावे लागेल. लोकांना हवे असल्यास, मी याबद्दल विचार करू शकते. जयललितांबद्दल बोलताना कंगना म्हणाली की जर तुम्ही पाहिले जयललिता यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतरही लोक त्यांच्यावर आजही एतकं प्रेम करत आहेत. कारण त्या जनतेशी प्रत्येक शक्य मार्गाने जोडल‌्या गेल्या होत्या आणि त्यांना मदत करत होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

तसेच कंगना मजेशीर अंदाजात म्हणाली की, एक देशभक्तासारखे बोलल्या बद्दल तिला कशाप्रकारे मोठी किंमत मोजावी लागली होती. तसेच यामुळे तिला अनेक प्रोजेक्ट गमवावे लागले.


हे हि वाचा – नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -