Kanganaचा पुन्हा Alia वर निशाणा, म्हणाली पापा की परी …

सिनेमात चुकीची कास्टिंग झाली आहे. हे सुधारणार नाही. त्यामुळे सिनेमागृहे आता फक्त साऊथ आणि हॉलिवूडकडे वळले आहेत. जोपर्यंत माफिया सत्तेत आहेत तो पर्यंत बॉलिवूडच्या नशीबात हेच आहे.

Kangana Ranaut again target alia bhatt on gangubai kathiawadi movie

Kangana Ranaut Target Alia Bhatt : पंगा गर्ल कंगना राणौत सध्या गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या विरोधात बोलताना दिसत आहे. सिनेमातील रिक्रिएट केलेल्या व्हिडीओवर तिने आलियाला चांगलचं धारेवर धरले होते.मात्र आता पुन्हा एकदा कंगनाने आलियावर निशाणा साधलाय. यावेळी कंगनाने आलियाची आणि निर्मात्यांची चांगलीच खिल्ली देखील उडवली आहे. आलियाच्या गंगूबाई काठियावाडी सिनेमावर कमेंट करत कंगनाने म्हटलेय, सिनेमात चुकीच्या व्यक्तीला कास्ट करण्यात आले आहे त्यामुळे सिनेमा रिलीज होताच फ्लॉप होईल. यावेळी कंगनाने आलियाला ‘पापा की परी’ असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्यात म्हटले आहे की, या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर २०० करोड रुपयांचा सिनेमा खाक होणार आहे. एक पापा की परी ( मूव्ही माफिया डॅडी ) आणि (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे ) कारण पापाला सिद्ध करायचे आहे की रोमकॉम बिम्बो अभिनय देखील करू शकतो. सिनेमात चुकीची कास्टिंग झाली आहे. हे सुधारणार नाही. त्यामुळे सिनेमागृहे आता फक्त साऊथ आणि हॉलिवूडकडे वळले आहेत. जोपर्यंत माफिया सत्तेत आहेत तो पर्यंत बॉलिवूडच्या नशीबात हेच आहे.

कंगनाने तिच्या पुढच्या स्टोरीमध्ये म्हटले आहे की, बॉलिवूड माफिया डॅडी पापा ज्यांनी संपूर्ण सिने इंडस्ट्रीची संस्कृती बदलली आहे. अनेक मोठ्या निर्मात्यांसोबत भावनिक चाली खेळल्या, त्यांचे मानसिक खच्चीकरण केले आणि त्याला पाहिजे त्या लोकांना काम दिले त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हा सिनेमा आपल्या समोर येईल. लोकांनी असे सिनेमे पाहणे बंद केले पाहिजे. या शुक्रवारी रिलीज होणारा सिनेमा दिग्दर्शक आणि अभिनेता ही याच्या खच्चीकरणचा बळी गेला आहे.


हेही वाचा – Dil Bechara फेम अभिनेत्रीवर अमेरिकन फ्लाइटमध्ये गैरवर्तन