HomeमनोरंजनKangana Ranaut : तन्नू- मन्नू पुन्हा एकत्र, कंगना आणि मॅडीच्या नव्या सिनेमाचे...

Kangana Ranaut : तन्नू- मन्नू पुन्हा एकत्र, कंगना आणि मॅडीच्या नव्या सिनेमाचे शूटिंग सुरु

Subscribe

'तन्नू वेड्स मन्नू' या सुपरहिट सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता आर. माधवन एकत्र दिसले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यानंतर आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते आहे. मात्र, यावेळी कंगना आणि मॅडी कोणती नवी धमाल घेऊन येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमरजेंसी’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा ठीक प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे 10 दिवस उलटून गेले तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा या सिनेमाला किंचित लाभ झाला. एका दिवसात ‘इमरजेंसी’ने करोडोंचा गल्ला केला. मात्र, असे असूनही बजेटच्या मानाने हा सिनेमा फार काही कमावू शकला नाही. त्यामुळे कंगना रनौत अभिनित आणि दिग्दर्शित ‘इमरजेंसी’ तिच्या करिअरमधला ११ वा फ्लॉप सिनेमा ठरला. यानंतर आता लवकरच तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ज्यामध्ये प्रेक्षकांची लाडकी तन्नू- मन्नूची जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्याची सज्ज झाली आहे. (kangana ranaut and r madhavan new film shoot has been started)

कंगना- मॅडीचा फोटो व्हायरल

‘तन्नू वेड्स मन्नू’ या सुपरहिट सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता आर. माधवन एकत्र दिसले होते. त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यानंतर आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते आहे. मात्र, यावेळी कंगना आणि मॅडी कोणती नवी धमाल घेऊन येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावर कंगना आणि माधवनचा एक फोटो व्हायरल होतो आहे. जो त्यांच्या आगामी सिनेमातील असल्याचे समजत आहे.

नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

अभिनेत्री कंगनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये नव्या सिनेमाच्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर टायटल म्हणून ‘प्रोडक्शन नंबर 18’ असे लिहिलेले दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आज चेन्नईत आम्ही नव्या सिनेमाची सुरुवात करत आहोत. जो साइकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. याबाबत लवकरच माहिती देईन. तूर्तास आपल्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे’. या नव्या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. अर्थात येत्या काळात हा नवाकोरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडकण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर आता प्रेक्षकही या सिनेमाबाबत अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

अभिनेता आर. माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’ सिनेमातून त्याने अत्यंत वेगळी भूमिका साकारली. या भूमिकेच्या माध्यमातून माधवन निगेटिव्ह भूमिकादेखील किती प्रभावी पद्धतीने साकारू शकतो हे सिद्ध झाले. यानंतर आगामी काळात त्याचा ‘दे दे प्यार दे 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही पहा –

Upcoming Movies : फेब्रुवारीत मनोरंजनाचा धमाका, बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे देणार एकमेकांना टक्कर