Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन लाओ मेरी चप्पल...यामी गौतमची खिल्ली उडवल्याने विक्रांत मेस्सीला कंगणाने झाडले

लाओ मेरी चप्पल…यामी गौतमची खिल्ली उडवल्याने विक्रांत मेस्सीला कंगणाने झाडले

तसेच विक्रमला टोला लगावत कंगणा म्हणाली" कुठून आला हा झुरळ,माझी चप्पल आणा" अशा आशयाची कमेंट करत कंगणाने विक्रांत आणि आयुष्मानला झाडले

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम नुकतच विवाहबंधनात अडकली आहे यामीने ‘ऊरी’ सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य धर सोबत हिमाचल प्रदेश येथे विवाह संपन्न केला. सध्या सोशल मीडियावर यामी आणि आदित्यचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून तसेच अनेक कलाकारांतर्फे दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामी सोबत सिनेमात झळकलेला अभिनेता विक्रांत मेस्सी याने यामीच्या ब्राइडल लुकवर कमेंट करत तिची खिल्ली उडवली. विक्रांतची कमेंट बॉलिवूडच्या पंगा क्वीनच्या पचणी पडली नाही तिने थेट विक्रांतवर निशाणा साधला आहे. इतकच नाही तर आयुष्मान खुरानावर सुद्धा तिने संताप व्यक्त केला आहे.

काय लिहलं आहे कमेंट मध्ये-

- Advertisement -

यामीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. आणि तिच्या हातात कलिरे घातलेले दिसत आहेत. आणि याच फोटोवर यामीची खिल्ली उडवत विक्रांतने यामीच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहलं आहे की,”शुद्ध आणि पवित्र ‘राधे माँ’ सारखी दिसत आहेस” तसेच अभिनेता आयुष्मान खुरानाने देखील यामीची मजा घेत लिहलं आहे” पूर्ण जय माता दी यासारखी फिलिंग येत आहे.तुम्ही दोघेही ज्वालाजी येथे गेले होते का ?” दोघांच्याही या कमेंटला कंगणाने सणसणीत उत्तर दिले आहे. आयुष्मानच्या कमेंटला उत्तर देत कंगणा म्हणाली” हिमाचल मधील नववधू खरचं खूप सुंदर दिसतात,देवीसारखचं त्यांचं तेज दिव्य असतं” तसेच विक्रमला टोला लगावत कंगणा म्हणाली” कुठून आला हा झुरळ,माझी चप्पल आणा” अशा आशयाची कमेंट करत कंगणाने विक्रांत आणि आयुष्मानला झाडले


हे हि वाचा – ‘हिरोपंती 2’टायगर दिसणार जबरदस्त अॅक्शन सीनमध्ये,अॅक्शन सीक्वेंस रशियात होणार चित्रित!

- Advertisement -