घरमनोरंजनबीएमसी घरावर हातोडा मारताना सपोटर्स कुठे होते ? कंगनाला विचारलेल्या प्रश्नावर आले...

बीएमसी घरावर हातोडा मारताना सपोटर्स कुठे होते ? कंगनाला विचारलेल्या प्रश्नावर आले उत्तर

Subscribe

अभिनेत्री कंगना रनौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कंगना सध्या या पुरस्कारामुळे चांगलीच चर्चेत आहे. या पुरस्कारानंतर कंगनाने नुकतीच टाईम्स नाऊला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगनाला अनेक खोचक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर कंगनाने देखील रंजक आणि सडेतोड उत्तरे दिली आहेत, यावेळी कंगनाला तिच्या घरावर आणि ऑफिसवर पालिकेने केलेल्या कारवाईसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. बीएमसीने तुझे घर तोडले तेव्हा तुला पाठिंबा देणारे, तुझा मित्रपरिवार का नाही आला? कुठे होते ते? असा प्रश्न कंगना रनौतला विचारण्यात आला. यावर कंगनाने केवळ उत्तरचं दिले नाही तर कोणी आत्तापर्यंत पाठींबा दिला त्यांची नावं जाहीर केली.

कंगनाने उत्तर देत सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये माझे खूप कमी मित्र-मैत्रिणी आहेत. यावर पुन्हा असा प्रश्न करण्यात आला की, मग तुमचे घर, ऑफिस पाडत होते तेव्हा हे लोक का पाठिंबा देण्यासाठी आले नाही? कोणी एक शब्द देखील का काढला नाही? यावर कंगनाने उत्तर दिले की, तुम्ही फक्त तरुण फॅन फॉलोअर असलेल्यांनाच पाहा, परंतु माझे असे अनेक मित्र आहेत ज्यांनी मला प्रोत्साहन दिले, मला पाठींबा दिला. यात मिस्टर प्रसून जोशी, मिस्टर विजेंद्र प्रसाद अशी अनेक लोकं आहेत. मी एक चित्रपट निर्माती आहे त्यामुळे माझा २०० लोकांचा क्रू आहे. हा क्रू माझा आहे ज्यांनी मला सपोर्ट केला.

- Advertisement -

यानंतर ‘वीर सावरकर – सेल्युलर जेल’ हे काय होते? कंगना रनौत खरंच ट्विटरच्या दुनियेतून बाहेर आली आहे की हा राजकीय स्टंट आहे? असा सवाल कंगनाला करण्यात आला. यावर कंगनाने हसत सांगितले की, तुम्ही मला मंत्री वैगरे समजता का?

यादरम्यान कंगनाने ती कोणाला आपला सुपरस्टार मानते हे देखील सांगितले. कंगना म्हणाली, मी ज्या कुटुंबातून आलेय त्या कुटुंबात पंतप्रधानांना सुपरस्टार मानले जाते. पंतप्रधान माझ्या कुटुंबासाठी सुपरस्टार आहेत आणि नेहमीच असतील. माझ्या आई-वडिलांनी माझ्या चित्रपटाच्या मुहूर्तावर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता.

- Advertisement -

दरम्यान कंगनाला पुढे विचारले आले की, ‘सुपरस्टार कंगना रणौतलाही पंतप्रधान सुपरस्टार का वाटतात? ज्यावर तुमचे कुटुंबीयही सहमत आहेत? यावर कंगना उत्तरात म्हणते- ‘नक्कीच, पीएम मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. यात शंका नाही. ते आपल्या देशाला लाभले हे आपले भाग्य आहे. मला वाटते की, त्यांनी आपल्या देशाला अशा ठिकाणी नेऊन ठेवले आहे जिथे उभे राहण्याचा आपल्याला खूप अभिमान आहे.


UPSC NDA 2 2021: UPSC कडून १४ नोव्हेंबरला होणाऱ्या NDA, NA II परीक्षेसाठीचे नियम जारी

 


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -