घरमनोरंजनकंगणाला ऑफिससाठी आर्किटेक्ट मिळेना

कंगणाला ऑफिससाठी आर्किटेक्ट मिळेना

Subscribe

कंगणा रनौतच्या कार्यालय बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली पाडले गेले होते. मुंबई हायकोर्टाच्या स्थगिती आदेशानंतर ही तोडफोट मधूनच थाबवण्यात आली होती. पण आता कोणताही आर्किटेक्ट वांद्रे येथील तिचे पाडलेले कार्यालय पुन्हा दुरुस्त करण्यास तयार नाही आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ने नुकतेच मुंबई येथील तिच्या ऑफिसमिटिंग दरम्यानचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच बीएमसी ची भीती असल्याने कोणताही आर्किटेक्ट वांद्रे येथील तिचे पाडलेले कार्यालय पुन्हा दुरुस्त करण्यास तयार नसल्याचा दावा कंगनाने केला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये बीएमसीने वांद्रे येथील कंगणाच्या कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली कार्यालय पाडले गेले होते. घटनेच्या सहा महिन्यांनंतरही तिला आपल्या कार्यालयाची दुरुस्ती करता येत नसल्याचा आरोप केल्याचं एक ट्वीट कंगनाने पोस्ट केले आहे. मुंबई हायकोर्टाच्या स्थगिती आदेशानंतर ही तोडफोट मधूनच थाबवण्यात आली होती.

 ‘मी बीएमसीविरूद्ध खटला जिंकला आहे. आता मला आर्किटेक्टमार्फत नुकसान भरपाईसाठी फाइल सादर करण्याची आवश्यकता आहे, परंतु कोणतेही आर्किटेक्ट माझे हे कामकाज हाती घेण्यास तयार नाहीत, व त्यांचा परवाना रद्द केला जाईल अशी धमकी त्यांना बीएमसीकडून येत आहे असे त्यांचे मत असल्याचे कंगना ट्विटमध्ये म्हणाली होती. कोर्टाने महापालिकेच्या मूल्यांकनकर्त्याला घटनास्थळाला भेट देण्यास सांगितले, परंतु अनेक महिन्यांनंतर तो आमचा फोन घेत नाही. त्यांनी गेल्या आठवड्यात भेट दिली, पण त्यानंतर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. हे माझे त्या घराचे निराकरण का करीत नाही असे विचारणार्‍या सर्वांसाठी आहे. असेही कंगना म्हणाली आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी वांद्रे येथील नव्याने तयार झालेल्या कार्यालयात बीएमसीच्या विध्वंस मोहिमेमध्ये भाग घेणाऱ्यांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार असल्याची धमकी कंगना रनौत दिली.


हे वाचा-शेतकरी आंदोलनाला पाठींबा न दिल्याने अजय देवगणची अडवणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -