Kangana Ranaut Controversy : ‘दुसरा गाल दिल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही’ कंगना रनौतचे आता महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान

Kangana Ranaut Controversy Kangana now targets Mahatma Gandhi, says ‘offering another cheek’ gets ‘bheek’ not freedom
K

Kangana Ranaut Controversy: आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेच असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलयं. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक लेख शेअर केला आहे. या पोस्टच्या हेडलाईनमध्ये लिहिलेय की, एकतर तुम्ही गांधींचे चाहते असून शकता किंवा नेताजींचे समर्थक…. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. यावर तुम्हीच ठरावा. तिने पुढे असेही लिहिले की, दुसरा गाल दिल्याने भीक मिळते, स्वातंत्र नाही. मात्र कंगनाच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे आता राजकीय वातावरण आणखी तापतेय. अशातच मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही कंगनाचा जाहीर पाठिंबा देत मी तिच्या वक्तव्याशी सहमत असल्याचे म्हटलेय. त्यामुळे कंगनाच्या विधानांवर समर्थन देणाऱ्यांवरही टीकेची झोड उठवली जात आहे.

कंगनाने सांगितले की, “ज्यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती, पण सत्तेची भूक होती अशांनी स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यांनीच आम्हाला शिकवले, जर तुम्हाला कोणी एक कानाखाली मारली तर दुसर्‍या गालावर आणखी एक कानाखाली खा. आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळते. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळत नाही, यातून फक्त भीक मिळू शकते. यामुळे आपले नायक हुशारीने निवडा.”

Kangana Ranaut Controversy Kangana now targets Mahatma Gandhi, says ‘offering another cheek’ gets ‘bheek’ not freedom
Kangana Ranaut Controversy : ‘दुसरा गाल दिल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही’ कंगना रनौतचे आता महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान

पद्मश्री पुरस्कार विजेती कंगना रानौत पुढे असं म्हणाली की,  “गांधींनी कधीचं भगतसिंग किंवा सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही… भगत सिंग यांना फाशी द्यावी अशी गांधीजींचीच इच्छा होती याचा पुरावा आहे… त्यामुळे तुम्ही कोणाला पाठिंबा देता हे तुम्ही निवडणे गरजेचे आहे…”

अलीकडेच कंगनाने २०१४ मध्ये भारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, जेव्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले, मात्र १९४७ मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य भीक होती असे विधान करत नव्या वादाला सुरुवात केली.  तिच्या या विधानावर आता राजकीय नेत्यांपासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वचं टीका करत आहेत. यात अनेक नेत्यांनी कंगनाचा पद्मश्री पुरस्कार मागे घेत तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. अनेक भागांत कंगनाविरोधात मोर्चे निघाले.

Kangana Ranaut Controversy Kangana now targets Mahatma Gandhi, says ‘offering another cheek’ gets ‘bheek’ not freedom
Kangana Ranaut Controversy : ‘दुसरा गाल दिल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही’ कंगना रनौतचे आता महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान

टीकेनंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “मी स्पष्टपणे सांगितले आहे की, १८५७ ची क्रांती ही पहिला स्वातंत्र्य लढा होता, मात्र हा लढा दडपला गेला, परिणामी ब्रिटीशांचे अत्याचार आणि क्रूरता आणखी वाढली आणि जवळपास एक शतकानंतर आम्हाला गांधीजी मिळाले त्यांच्या भीकेच्या कटोऱ्यात स्वातंत्र्य दिले.

एकीच मारा लेकीन सॉलिड मारा! कंगना समर्थक विक्रम गोखलेंवर अतुल कुलकर्णीचे मार्मिक ट्विट