कंगना रनौतला नाही आवडला दीपिका पदुकोणचा ‘Gehraiyaan’ चित्रपट, म्हणाली…

कंगनाने बॉलिवूडची मस्तानी दिपिका पदुकोणवर टिकेची तोफ डागली आहे. सध्या दिपिका तिच्या 'गेहराइयां' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात कगंना रनौत आणि दीपिका पदुकोण,सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यासारख्या कलाकार आहेत. दिपिकाचा मोस्ट अवेटेड सिनेमा अमेजॉन प्राईम पर रिलीज झाला असून, हा सिनेमा पाहिल्यानंतर कंगना रनौतने सोशल मीडियावर या सिनेमाबाबत एक पोस्ट लिहली असून, सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.

Kangana Ranaut doesn't like Deepika Padukone's 'Gehraiyaan' movie, says ...
कंगना रणौतला नाही आवडला दीपिका पदुकोणचा 'Gehraiyaan' चित्रपट, म्हणाली...

बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत जे आपल्या सिनेमाव्यतिरिक्त वादग्रस्त कामिगरी तसेच वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कंगना नेहमीच तिच्या सडेतोड वक्यव्यामुळे ट्रोलिंगसह राजकारणी मंडळींच्या देखील निशाण्यावर असते. आता कंगनाने बॉलिवूडची मस्तानी दिपिका पदुकोणवर टिकेची तोफ डागली आहे. सध्या दिपिका तिच्या ‘गेहराइयां’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात कगंना रनौत आणि दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यासारख्या कलाकार आहेत. दिपिकाचा मोस्ट अवेटेड सिनेमा अमेजॉन प्राईम पर रिलीज झाला असून, हा सिनेमा पाहिल्यानंतर कंगना रनौतने सोशल मीडियावर या सिनेमाबाबत एक पोस्ट लिहली असून, सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.

 

शनिवारी रात्री कंगना रनौतने तिच्या इंस्टा स्टोरीजवर मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्या चित्रपटातील ‘चांद सी मेहबूबा हो मेरी’ हे गाणे शेअर केले आणि लिहिले की, ‘मीही मिलेनियमची स्टार आहे, पण तरीही अशीच आहे. मला प्रणय माहित आहे आणि समजतो.’ याशिवाय, नवीन युग आणि शहरी चित्रपटांच्या नावाखाली कचरा विकू नका. कोणताही चित्रपट कितीही स्किन शो किंवा पोर्नोग्राफी दाखवली तरी ती वाचवू शकत नाही. यात काहीच गेहराई नाहीये हेच सत्य आहे, असे ती म्हणाली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास, कंगना आता एका नव्या रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. लॉक अप असं या शोचं नाव असून, या रिअॅलिटी शोमध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटींना कैद करुन ठेवण्यात येणार आहे.


हे ही वाचा – Salman Khanचा रिअ‍ॅलिटी शो Big Boss च्या सेटवर लागली भीषण आग