कंगना रनौतची ट्विटरवर पुन्हा टिवटिव सुरू; चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

kangana ranaut emergency actress bollywood queen returns to twitter after one and half year

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजकीय घटनेवर आधरित हा चित्रपट आहे. कंगना या चित्रपटामुळे तर चर्चेत आहेच पण ती एका वेगळ्या कारणामुळे आता चर्चेचा विषय ठरेतय, याचं कारण म्हणजे तिचं ट्विटर अकाऊंट. कंगनाने जवळपास दीड वर्षांनंतर ट्विटर पुन्हा एन्ट्री घेतली आहे. यामुळे ट्विटरवर कंगनाची टिवटिव पुन्हा सुरु होणार आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या अकाऊंटवरून ट्विट करत युजर्सला ही माहिती दिली आहे.

अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट गेल्यावर्षी सस्पेंड करण्यात आलं होत पण आता ट्विटरची मालकी एलन मस्क यांच्याकडे जाताच अभिनेत्री पुन्हा ट्विटरवर परतली आहे. कंगनाने अलीकडेच तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ट्विटरवर पुन्हा पुनरागमन करत असल्याची घोषणा केली. अभिनेत्रीच्या या घोषणेमुळे तिचे चाहतेही खूश झाले आहेत. कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत लिहिले की, सर्वांना नमस्कार, इथे परत आल्याने खूप छान वाटत आहे. कंगनाच्या या ट्विटवर चाहते सतत रिट्विट करत आहेत. यासोबत तिच्या पोस्टवर कमेंट करत आनंद व्यक्त करत आहेत.

कंगना रनौत याआधी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे चर्चेत होती. मात्र मागील एक वर्षांपासून तिचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं, टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंगनाला आशा होती की, ती ट्विटरवर लवकरं परत येईल आणि तसेच झाले.  यानंतर कंगनाने एलन मस्क यांच तोंड भरून कौतुकही केलं.

कंगना रनौत

ट्विटर अकाऊंट ब्लॉक होताच कंगना रनौत गेल्या वर्षभरापासून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांच्या संपर्कात होती. 9 मे 2021 रोजी बऱ्याच वादानंतर अभिनेत्रीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं.

कंगनाच्या वर्कफ्रंडबद्दल सांगायचे झाल्यास नुकतचं तिने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाच्या नावावरून अंदाज बांधला जातो की, हा चित्रपट देशातील सर्वात मोठ्या राजकीय घटनेवर आधारित आहे. ‘इमर्जन्सी’मध्ये कंगना रनौत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कंगनाने अभिनयासोबत दिग्दर्शनही केलं आहे.


मित्राला भेटायला गेली म्हणून श्रद्धाची हत्या; दिल्ली पोलिसांचा आरोपपत्रात दावा