‘सीता रामम’ पाहून कंगनाला पडली मृणाल ठाकूरची भुरळ; पोस्ट शेअर करत केलं कौतुक

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'सीता रामम' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मृणालचा अभिनय अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण फक्त मृणालचं कौतुक फक्त प्रेक्षकांनीच नाही तर अभिनेत्री कंगना रनौतने देखील केलं आहे.

बॉलिवूडची धाकड गर्ल अभिनेत्री कंगना रनौत वारंवार तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना तिच्या सोशल मीडियावरून अनेक गोष्टींबाबत आपलं परखड मत मांडत असते. तसेच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींवर निशाणा साधत असते. दरम्यान, नुकतंच कंगनाने हिंदी टेलिव्हिजनपासून, बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

कंगना रनौतने केलं मृणाल ठाकूरचं कौतुक
नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ‘सीता रामम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मृणालचा अभिनय अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण फक्त मृणालचं कौतुक फक्त प्रेक्षकांनीच नाही तर अभिनेत्री कंगना रनौतने देखील केलं आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं कौतुक करत एक स्टोरी शेअर केली आहे.

यामध्ये कंगनाने लिहिलंय की, “या चित्रपटात सर्व कलाकारांनी छान काम केलं आहे. परंतु मला ज्या गोष्टीने आकर्षित केलं ती आहे मृणाल ठाकुरचा अभिनय कोणतीही अभिनेत्री इतक्या छान पद्धतीने राजकुमारी नूरजहा उर्फ सीता महालक्ष्मीची भूमिका साकारू शकत नव्हती. काय जबरदस्त कास्टिंग आहे. खरंच तू राणी आहेस. जिंदाबाद ठाकूर साहेब”.

तसेच कंगनाने पुढच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, शेवटी मला सीता रामम चित्रपट पाहण्याचा वेळ मिळाला. मी हे सांगू इच्छिते की हा खूप छान अनुभव आहे आणि खूप छान प्रेमकथा आहे. या चित्रपटाची गोष्ट आणि दिग्दर्शन खूपच सुंदर आहे. हनु राघवपुडी तुमचे खूप खूप अभिनंदन, डिपार्टमेंटच्या सर्व लोकांनी खूप छान काम केलं आहे. मृणाल ठाकूरचा हा पहिला तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाला संपूर्ण देशातील प्रेक्षकांची पसंती मिळाली.


हेही वाचा :

नागा चैतन्यला विसरण्यासाठी समंथा रूथ प्रभू करतेय दुसरं लग्न