घरताज्या घडामोडीTiku weds Sheru: कंगनाच्या पहिल्याच प्रोडक्शन सिनेमात 'ही' अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

Tiku weds Sheru: कंगनाच्या पहिल्याच प्रोडक्शन सिनेमात ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

Subscribe

सिनेमाच्या पहिल्या लुकमधूनच सिनेमा इंन्ट्रेस्टिंग असल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री कंगना रनौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले आहे. कंगना सध्या या पुरस्कारामुळे चांगलीच चर्चेत आहे. याच वेळी कंगानाने पहिल्यांदा निर्माती म्हणून काम केलेला सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमाचे पहिले पोस्टर आज लाँच झाले आहे. या सिनेमात छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर आपण केवळ या अभिनेत्रीला डान्सर म्हणून पाहिले आहे त्याचप्रमाणे छोट्या पडद्यावरही उत्तम काम करताना पाहिले आहे ती अभिनेत्री ‘अवनीत कौर’. अवनीत कौर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ‘नवाजुद्दीन सिद्धिकी’सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

- Advertisement -

कंगनाने निर्मिती केलेल्या पहिल्या सिनेमात तिने अभिनेत्री अवनीत कौरला संधी दिली आहे. टिकू वेड्स शेरू या सिनेमाचे पहिले पोस्टर आज रिलीज करण्यात आले. कंगनाच्या ‘मणकर्णिका’ सिनेमाच्या प्रोडक्शन हाउसच्या माध्यमातूनच कंगनाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या पहिल्या लुकमधूनच सिनेमा इंन्ट्रेस्टिंग असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

‘चलो तो चाँद तर नही तो शाम तक’, असे म्हणत कंगनाने सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याचप्रमाणे ‘हम जब मिलते है, तो दिल से मिलते है, वरना ख्वाबों में भी मुश्किल से मिलती है’, असे म्हणत नवाजुद्दीन सिद्धिकीचा पहिला लुक शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये अवनीत आणि नवाजुद्दीन सिद्धिकी लग्नाच्या पोशाखात बसलेले दिसत आहेत. सिनेमात नक्कीच ड्रामा आणि मनोरंजन असणार हे पोस्टरमधून दिसून येत आहे.

अवनीतने पोस्टरवरील तिच्या पहिल्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अवनीतने टेलिव्हिजनवरील ‘डान्स इंडिया डांन्स लिटिल मास्टर’ या रिअँलिटी शोमधून सुरुवात केली होता. त्यानंतर ती मॉडेलिंग करताना देखल दिसली होती. अनेक जाहिरातीमधील अवनीत ही ओळखीचा चेहरा बनली आहे. ‘मेरी माँ’ या टेलिव्हिजन शोमधून अवनीतने अभिनय क्षेत्रात एंट्री केली. त्यानंतर अवनीत ‘सावित्री’, ‘अलादीन नाम तो सुना होगा’, ‘हमारी सिस्टर दीदी’ आणि ‘चंद्र नंदिनी’ या मालिकेत दिसली होती.


हेही वाचा – Padma Awards 2020: कंगना रनौत, अदनान सामींसह १०२ मान्यवरांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, पाहा फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -