Kangana Ranaut : हातात बेड्या पायात बूट, कंगना रनौतची रिअ‍ॅलिटी शोमध्ये एन्ट्री

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता या बॉलीवूडच्या पंगा गर्लचा नवा लूकची जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. यावेळी कंगना सिनेमाच्या माध्यमातून नाही तर एक नवा कोरा रिअ‍ॅलिटी शो अंतर्गत दंगा घालणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.

Kangana Ranaut: Handcuffed shoes, Kangana Ranaut's entry in reality show
Kangana Ranaut : हातात बेड्या पायात बूट, कंगना रनौतची रिअ‍ॅलिटी शोमध्ये एन्ट्री

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता या बॉलीवूडच्या पंगा गर्लचा नवा लूकची जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. यावेळी कंगना सिनेमाच्या माध्यमातून नाही तर एक नवा कोरा रिअ‍ॅलिटी शो अंतर्गत दंगा घालणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. लॉक अप बॅडलेस जेल अत्याचारी खेळ असून, हा रिअ‍ॅलिटी शो लवकरच एमक्स प्लेयर आणि ऑल्ट बालाजीवर रिलीज होणार आहे. या शोचा फस्ट लूक तिने सोशल मिडियावर रिवील केले आहे.

यावेळी कंगना रनौत एकदमच धाकड स्टाईलमध्ये दिसतेय. गोल्डन सूटबूट, हातामध्ये बेड्या आणि कैद्यांच्या पाठीवर पाय ठेवून उभी आहे. या शोच्या पोस्टवरून दिसून येते आहे की , कंगना या शोमध्ये फुल टू राडा करणार असल्याचे समोर दिसत आहे. सध्या कंगनाचा हा दमदार लूक सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. #Kangana ka Lock Upp हे मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असून, तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

येत्या 27 फेब्रुवारीपासून एम एक्स पेल्यरवर आणि ऑल्ट बालाजीवर चोवीस तास तब्बल सात दिवीस लाईव स्ट्रीम होणार आहे. या शोमध्ये कंगना होस्टची भूमिका साकारणार आहे. या शोच्या निर्मात्याची धुरा एकता कपूर सांभळणार आहे. लॉक अप या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कंगना एक्साइटेड असल्याचे दिसत आहे. नुकतंच तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन तिने फस्ट लूक रीवील केला आहे.

एका आगळ्या वेगळ्या कॉन्सेप्टवर आधारीत हा ‘लॉक अप’ शो आहे. या स्पर्धकांना 72 दिवस कैद करुन ठेवण्यात येईल. यावेळी त्यांच्याकडून सर्व सोयी सुविधा हिसकावून घेतल्या जातील. यासह अशी देखील माहिती मिळतेय कि, या शोमध्ये मॉडल पूनम पांडे सारख्या वादाच्या कचाट्यात अडकलेले स्पर्धक देखील झळकणार आहेत. यासह शहनाज गिल,चेतन भगत,रोहमन शॉलसारखे कालाकार जे हिंदी टेलिव्हीजनवरील मनोरंजन सृष्टीतील कलाकारही दिसणार आहेत.

अभिनेत्री कगंना रनौतच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास, ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. कंगनाचे आगामी सिनेमा म्हणजे ‘तेजस’ हा 5 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. धाकड सिता यासारखे बिग बजेट सिनेमामध्ये देखील दिग्दर्शित होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून कंगना आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यात न्यायालयानी कारवाई सुरू आहे.


हे ही वाचा – Amol Palekar : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा