घरमनोरंजनमुंबईच्या पावसात कंगनाची घोडेस्वारी,पहा व्हिडिओ

मुंबईच्या पावसात कंगनाची घोडेस्वारी,पहा व्हिडिओ

Subscribe

व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेकांनी कंगनाला थलायवी सिनेमाविषयी विचारले

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut )  नेहमीच चर्चत असते. कंगना सोशल मीडियावरही बरिच सक्रिय असते. तिची प्रत्येक वक्तव्य सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. मुंबईत सध्या पाऊस सुरु आहे. मुंबईच्या पावसात सध्या कंगनाची जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा होतेय कंगनाने मुंबईच्या पावसात केलेल्या घोडेस्वारीची. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडियावरुन मुंबईच्या पावसात घोडेस्वारी करतानाचा तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा घोडेस्वारीचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. (Kangana ranaut horse riding in the rain in Mumbai)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


कंगनाने मुंबईतील भर पावसात घोडेस्वारी करत असलेला व्हिडिओ तिच्या इन्टाग्रामवरुन शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कंगनाने ब्लॅक रंगाची पॅन्ट आणि ऑरेंज रंगाने टि शर्ट घातले आहे. मुंबईत गेली तीन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. ‘आज सकाळी घोडेस्वारी केली’,असे म्हणत कंगनाने व्हिडिओ शेअर केला आहे. पावसाळ्याच्या परफेक्ट मोसमात घोडेस्वारीचा आनंद घेताना कंगना खूप खुश दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्या आहेत. तर अनेकांच्या हा व्हिडिओ पसंतीस उतरला आहे. व्हिडिओला लाखो लाईक्सही मिळाले आहेत.

- Advertisement -

कंगनाच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेकांनी तिला तिच्या थलायवी सिनेमाविषयी विचारले आहे. चाहत्यांच्या कमेंटमधून कंगनाच्या थलायवी सिनेमासाठी ते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. कंगना आपल्या कुटुंबासोबत मनालीमध्ये वेळ घालवत होती. त्यानंतर आता ती पुन्हा मुंबईत आली आहे. कंगना पुढील काळात अनेक धमाकेदार सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. कंगनाचे थलायवी, तेजस,धाकड हे सिनेमे प्रदर्शित होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.


हेही वाचा – Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतच्या फिल्मी करिअरचा प्रवास उलगडणारी वेबसाईट चाहत्यांसाठी लॉंच

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -