पाकिस्तानमध्ये ‘थलायवी’ टॉप ट्रेंडला, कंगना म्हणतेय ‘देशद्रोही फक्त भारतात नाही तर पाकमध्येही’

Kangana Ranaut jokes about Thalaivii trending in Pakistan: ‘Relieved to know traitors are not in just our country’
पाकिस्तानमध्ये 'थलायवी' टॉप ट्रेंडला, कंगना म्हणतेय 'देशद्रोही फक्त भारतात नाही तर पाकमध्येही'

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा बहुचर्चित थलायवी हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मात्र रिलीजच्या दुसऱ्याचं दिवशी या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झालीय. कंगनाचा थलायवी हा सिनेमा प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे. कंगनाने थलायवीच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात पोस्ट व्हायरल करतेय. मात्र ट्विटरवर कंगनाला बॅन करण्यात आल्याने तिने इन्स्टाग्रामवर प्रोमेशनचे नवे फंडे वापरले आहेत. मात्र या सिनेमाची केवळ भारतातचं नाही तर पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खुद्द कंगनानेच इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत पाकिस्तानमध्ये थलायवी का टॉप ट्रेंडला गेलाय? याविषयीचा खुलासा केला आहे.

कंगनाने या पोस्टमध्ये पाकिस्तानमधील नेटफ्लिक्स टॉप १० चित्रपटांची लिस्ट शेअर केली आहे. यात थलायवी पहिल्या नंबरवर ट्रेंड होतोय. कंगनाने हसत या पोस्टसह कॅप्शनमध्ये लिहिले, एका नोटवर, देशद्रोही फक्त आपल्या देशातच नाहीत हे जाणून दिलासा मिळला.

Kangana Ranaut jokes about Thalaivii trending in Pakistan: ‘Relieved to know traitors are not in just our country’
पाकिस्तानमध्ये ‘थलायवी’ टॉप ट्रेंडला, कंगना म्हणतेय ‘देशद्रोही फक्त भारतात नाही तर पाकमध्येही’

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात जयललिता यांचा अभिनेत्रीपासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा एक प्रवास दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. यात दिवंगत मुख्यमंत्री एमजीआर, दिवंगत शिवाजी गणेशन आणि अन्य लोकांच्या व्यक्तिरेाही दाखवण्यात आल्या आहेत. यासाठी कंगना सोबतच अरविंद स्वामी, भाग्यश्रीसह अनेक सेलेब्स महत्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. प्रत्येकाचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे.