घरमनोरंजनDhaakad: रक्तानं माखलेली दिसली कंगना; ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट

Dhaakad: रक्तानं माखलेली दिसली कंगना; ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट

Subscribe

बॉलिवूडची धाकड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तिचं धाकडपण दाखवताना दिसणार आहे. कंगनाचा हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार असून ज्यामध्ये कंगना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आज या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा केली आहे. हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. धाकड चित्रपटाचे जे पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आलं त्यामध्ये कंगनाच्या हातात तलवार असून तिच्या आजू-बाजूला चौफेर रक्त दिसत आहे. स्वतः कंगना रक्ताने माखलेल्या लूकमध्ये या पोस्टरवर दिसतेय.

- Advertisement -

चित्रपट निर्मात्यांनी असा दावा केला की, धाकड हा चित्रपट असा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून भारतीय चित्रपटाची वेगळी उंची गाठण्यास मदत करेल. भोपाळमध्ये कंगना सध्या तिच्या आगामी या धाकड चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन शूट करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये कंगना एका मशीनगनसह धावताना दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध जाहिरात चित्रपट निर्माता रजनीश ‘राजी’ घई करणार आहेत. सोहेल मक्लाई प्रॉडक्शन आणि एजाइलम फिल्म्स संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चिंतन गांधी आणि रिनेश रवींद्र यांच्यासमवेत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाची कथा राजी यांनी लिहिली असून रितेश शहा यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -