घरमनोरंजनआमिर-किरणच्या घटस्फोटानंतर कंगनाने केला सवाल.. मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी धर्म का बदलावा?

आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर कंगनाने केला सवाल.. मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी धर्म का बदलावा?

Subscribe

कंगनाने अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच किरण राव (Kiran Rao) घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आमिर-किरणवर तोफ डागली आहे.

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रनौत(kangana ranaut) तिच्या बेताल वक्यव्यांमुळे सतत लाइम लाइटमध्ये असते. कंगना सोशल मीडियावर कमालिची सक्रीय असते. आपले रोखठोक मत ती नेहमीच लोकांसमोर मांडत असते. इतकेच नाही तर बॉलिवूडमधील अनेक बड्या दिग्दर्शक तसेच कलाकार,निर्मात्यावर निशाना साधते. नुकतच कंगनाने अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने (Kiran Rao) घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आमिर-किरणवर तोफ डागली आहे. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर भली मोठी पोस्ट शेअर करत लिहले आहे की, “एकेकाळी पंजाबमध्ये प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती त्यांच्या एका मुलाला हिंदू तसेच दुसऱ्या मुलाला सिख धर्माचा स्विकार करण्यास सांगत असे. अशी परंपरा हिंदू-मुस्लिम किंवा सिख-मुस्लिम परिवारात घडली नाहीये. आमिर खान सरांचा घटस्फोट झाल्याने मला फार आश्चर्य वाटले कि,अंतरधार्मिक विवाहादरम्यान मुलं नेहमी मुस्लिमचं का बनतात? महिला हिंदू का नाही राहू शकत? वेळेसोबत आपण स्वत: मध्ये बदल घडवायला हवा. ही एक जुनाट तसेच चूकीची प्रथा आहे. जर एका कुटूंबात हिंदू, जैन, बौद्ध, सिख, राधास्वामी आणि नास्तिक राहू शकताता तर मुस्लिम का नाही? का एखाद्या मुस्लिमशी लग्न केल्यावर आपला धर्म बदलावा लागतो ?”(kangana ranaut questions interfath marriage on aamir khan kiran rao divorce)

kangna ranaut insta story

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान तसेच किरण राव यांनी आपल्या 15 वर्षाच्या वैवाहीक जिवनामध्ये वेगळे होत असल्याची घोषणा केली. तसेच दोघांनी जॉईंट स्टेटमेंट जाहीर करत त्यांचा मुलगा आजाद राव खान (Aazhad rao khan) याला एकत्र मिळून सांभाळणार अल्याचे म्हंटलं आहे. आमिर खान आणि किरण राव यांचा विवाह 28 डिसेंबर 2005 साली झाला होता. याआधी अभिनेता आमिर खानने रीना दत्ता (Reena Datta)सोबत विवाह केला होता.

- Advertisement -


हे हि वाचा  – आमिर-किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णायावर हिना खानचा मोठा खुलासा म्हणाली…



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -