कॉमेडियन वीर दासवर भडकली कंगना, ‘हा आतंकवाद्यापेक्षा कमी नाही’ म्हणत केली कारवाईची मागणी

kangana ranaut reaction on comedian vir das video
कॉमेडियन वीर दासवर भडकली कंगना, 'हा आतंकवाद्यापेक्षा कमी नाही' म्हणत केली कारवाईची मागणी

कॉमेडियन आणि अभिनेता वीरदास त्याच्या एका व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिलांची दिवसा चौकशी आणि रात्री सामूहिक बलात्कार असे म्हणत केलेल्या व्हिडिओनंतर वीर दास सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होता. त्यातच सध्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगनाने देखील यावर भाष्य केले आहे. कंगनाने वीर दासच्या विरोधात तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर भली मोठी पोस्ट लिहित त्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. वीर दास हा आतंकवाद्यापेक्षा कमी नाही असे म्हणत कंगनाने त्याच्या अटकेची मागणी केली आहे. वीर दासच्या व्हिडिओची कंगनाने आतंकवादाशी तुलना केली. कंगना एवढ्यावरच न थांबता तिने वीर दास फालतू माणूस असल्याचे देखील म्हटले आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कंगनाने तिच्या इंन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहित वीर दासच्या व्हिडिओवर टीका केली आहे. त्यात कंगनाने म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही भारतीय पुरुषांना सामूहिक बलात्कार करणारे म्हणून सामान्यीकृत करता तेव्हा जगभरातील भारतीयांच्या विरोधात लिंगभेद आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देता. बंगालच्या दुष्काळानंतर चर्चिलने म्हटले होते की, हे भारतात सश्यांप्रमाणे प्रजनन करतात त्यांना असंच मरावे लागेल. उपासमारीने लाखो लोकांच्या मृत्यू झाला आणि या मृत्यूला त्यांनी भारतीयांच्या प्रजनन क्षमतेला जबाबदार धरले. संपूर्ण जातीला लक्ष करणारे हे आतंकवाद्यांपेक्षा कमी नाही अशा गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे,असे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्याचप्रमाणे पुढे कंगनाने वीर दासची एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, अशा फालतू माणसाचे उदाहरण कोणत्याही गोष्टीसाठी देणे योग्य नाही. म्हणूनच तो त्यांच्यासारख्या लोकांना त्याचा फालतूपणा विकतो,असे कंगनाने म्हटले आहे.

वीर दास व्हिडिओमध्ये काय म्हणाला?

देशातील दुहेरी वर्णाचा उल्लेख वीर दासने व्हिडिओमध्ये केला होता. तो म्हणाला की, मी अशा भारतातून आलो आहे जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते त्याच महिलेवर रात्री सामूहिक बलात्कार केला जातो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे तुमचा AQ1 ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छपावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. भारतात शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगतात आणि त्याच भारतात शेतकऱ्याला त्रास दिला जातो,असे तो म्हणाला आहे. हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात अडकला. वीर दासच्या विरोधात केस देखील फाइल करण्यात आली आहे.


हेही वाचा – KBC 13 : हॉट सीटच्या स्पर्धकाची बिग बींनी घेतली धास्ती, म्हणाले – “हा तर माझी पोल खोलेल…”