विक्की – कतरिनाच्या वयातील अंतरावर कंगनाची कमेंट म्हणाली ‘बरं वाटलं…’

kangana ranaut reaction on katrina kaif and vicky kaushal age gap
विक्की - कतरिनाच्या वयातील अंतरावर कंगनाची कमेंट म्हणाली 'बरं वाटलं...'

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकांचे लक्ष दोघांच्या लग्नाच्या अपडेट्सकडे आहे, मात्र दोघांनी लग्नासाठी इतकी कडक सुरक्षा तैनात केली आहे की, लग्नाचा एक फोटो किंवा व्हिडिओ देखील बाहेर येणे कठीण आहे. सोशल मीडियावरही विकी-कतरिनाचे लग्न ट्रेंडिंगला आहे. अशातच बॉलिवूडची दबंग गर्ल अभिनेत्री कंगना रनौतने हिने विक्की – कतरिनाच्या वयातील अंतरावर कमेंट केलीय. विक्की कौशल ३३ वर्षांचा आहे तर कतरिना कैफ ३८ वर्षांची आहे. विक्कीने वयात इतका फरक असून कतरिनासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहून बरं वाटलं…’ असं कंगनाने म्हटलं आहे.

माहितीय का? ज्योतिष आणि अंक गणितानुसार कसं असेल vicky आणि Katrinaचं नव आयुष्य

कंगना रनौत कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या वयातील अंतरावर बोलताना म्हणाली की, “लहानाचे मोठे होत असताना आम्ही एक यशस्वी श्रीमंत व्यक्तीचे त्याच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या स्त्रीसोबत लग्न झाल्याच्या कथा ऐकल्या. एका विवाहित स्त्रीने पतीपेक्षा यशस्वी होणे हे एका पतीसाठी अडचणीचे ठरत असे म्हटले जाते.”

Vicky-Katrina Wedding : विकी- कतरिनाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात, दोघांविरोधात गुन्हा दाखल

“एका ठरावीक वयानंतर एका स्त्रीने कमी वयाच्या पुरुषासोबत लग्न करण्याचा विचार तर सोडा, लग्न करणचं अशक्य होते. मात्र भारतीय सिनेसृष्टीत श्रीमंत आणि यशस्वी महिलांच्या सेक्सिस्ट मापदंड तोडताना पाहून बरं वाटतयं. पुरुष व महिला लैंगिक रुढीपरंपरा पुन्हा परिभाषित करत असल्याने दोघांचे अभिनंदन.” असं म्हणत कंगना रनौतने आपले मत मांडले.