Lock UPP Trailer: कंगनाच्या रिअॅलिटी शोमध्ये वाद, बोल्डनेसचा बोलबाला; स्पर्धांची डार्क सीक्रेट्स आणणार जगासमोर

kangana ranaut reality show Lock upp trailer out controversial celebrities to reveal their secrets openly watch trailer
Lock UPP Trailer: कंगनाच्या रिअॅलिटी शोमध्ये वाद, बोल्डनेसचा बोलबाला; स्पर्धांची डार्क सीक्रेट्स आणणार जगासमोर

बॉलिवूडची धाकट गर्ल अभिनेत्री कंगना रानौतचा बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘लॉक अप – बेडएस जेल, अत्याचारी खेल’चा ट्रेलर बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात रिलीज करण्यात आला. MX Player आणि Alt Balaji प्लॅटफॉर्मवर 27 फेब्रुवारीपासून हा शो विनामूल्य प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शोचा ट्रेलर प्रेक्षकासाठी रिलीज करण्यात आला. यात कंगनाच्या आवाजातून संपूर्ण शोचा मूड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला, ज्याबद्दल आतापर्यंत फक्त दावे केले जात होते. कंगनाचा हा शो खूपच बोल्ड आणि वादग्रस्त असणार आहे, कारण कंट्रोवर्शियल स्पर्धकांनाही त्यांची गुपिते उघडी करावी लागणार आहेत.

शोच्या ट्रेलरच्या सुरूवातीलाच कंगना रानौत चमकदार गोल्डन गाऊनमध्ये दिसतेय. यात ती म्हणते की, एक अशी जागा जिथे राहणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही… वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. ती म्हणजे हा लॉकअप. यानंतर कैद्यांच्या ड्रेसमध्ये स्पर्धकांची एंट्री होते आणि कंगना यावर म्हणते की, येथे स्पर्धकांच्या हाय क्लास गरजांची अजिबात काळजी घेतली जाणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

यात स्पर्धकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू ट्रेमध्ये ठेवून टूथब्रश, पेस्ट आणि आंघोळीच्या साबणाची वडी दिली जाते. यावत पुढे कंगना म्हणते की, या सेलिब्रिटींच्या दुःखाचा आपण नक्कीच विचार करू. त्यामुळे हातकड्यांसोबतच स्पर्धकांना अशा स्पर्धकांचा आधार मिळणार आहे जे त्यांच्या नाई नऊ आणू शकतात. या सेलिब्रिटींमध्ये काही असे आहेत ज्यांना खुलेपणाने जगण्याची सवय आहे. म्हणूनच आता कपडे उतरवले तर सगळ्यांसमोर. शोमधून आऊट होऊ नये यासाठी या सेलिब्रिटींना त्यांची गुपितंही सर्वांसमोर सांगावी लागतील. भारतातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींवर 24×7 लक्ष ठेवण्यासाठी या बेडएस जेलमध्ये होणार अत्याचारी खेळ. शेवटी कंगना म्हणते की, इथले सेलिब्रिटी मला वाटेल ते करतील.

16 वादग्रस्त सेलिब्रिटी होणार स्पर्धक

या शोमध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटींना 72 दिवस लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांच्या सर्व सुविधा काढून घेतल्या जाणार आहेत. त्यांच्या हाय क्लास मागण्या पूर्ण करणे तर दूरच या स्पर्धकांना शोमध्ये अशा लोकांसह तुरुंगात टाकले जाईल जे त्यांना पाहायलाही आवडत नाहीत. एविक्शनपासून वाचण्यासाठी सेलिब्रिटी स्पर्धकांना त्यांचे डार्क सीक्रेट्स संपूर्ण जगासमोर उघड करण्याशिवाय पर्याय नाही.

ALTBalaji आणि MX Player च्या प्लॅटफॉर्मवर या शो 24×7 लाइव्ह स्ट्रीम होणार आहे. यात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला शिक्षा सांगण्याची किंवा बक्षीस देण्याची आणि त्यांच्यापैकी काहींसाठी ‘खबरी’ची भूमिका करण्याची संधी मिळेल. Endemol Shine India द्वारे निर्मित हा शो 27 फेब्रुवारी 2022 पासून ALTBalaji आणि MX Player वर प्रीमियर होईल.