Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'द डर्टी पिच्चर' भूमिकेसाठी कंगनाचा होता नकार, म्हणाली विद्याप्रमाणे भूमिका साकारणे अवघड

‘द डर्टी पिच्चर’ भूमिकेसाठी कंगनाचा होता नकार, म्हणाली विद्याप्रमाणे भूमिका साकारणे अवघड

आणि एके रात्री तिचे आयुष्य बदलून जाते. तीला 'सिल्क' म्हणून ओळखले जाऊ लागते , तिचे यश आणि कीर्ति तिला बदलवून टाकते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना नेहमीच  चित्रपटामुळे तसेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत लाईम लाईट मध्ये असते. नुकतच कंगनाने एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री विद्या बालनची प्रशंसा केली आहे. मुलाखतीमध्ये कंगनाला प्रश्न विचारण्यात आला होता की, “तुला आज पर्यंत कोणता चित्रपट नाकारल्याचे दुख: झाले?” तेव्हा कंगनाने याचे उत्तर देत ब्लॉकबस्टर चित्रपट ‘द डर्टी पिच्चर’ बाबत खुलासा केला आहे. विद्या बालनची मुख्य भूमिका असणारा चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ आधी माला ऑफर करण्यात आला होता. मेकर्सने सर्वात आधी मला चित्रपटासाठी ऑफर दिली होती. त्यावेळेस मी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. मला याचे दुख: नाही विद्या बालन हिने चित्रपटात उत्तम काम केलं आहे कदाचित मी सुद्धा ती भूमिका योग्य प्रकारे निभाऊ शकले नसते. पण मला आत्ता असे वाटत आहे की जेव्हा माझ्या कडे चित्रपटाची ऑफर आली त्यावेळेस माझ्यातील पोटेंशियल पाहू शकले नाही .

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

2011 साली आलेला ‘द डर्टी पिच्चर’ हा विद्या बालनच्या चित्रपटातील करिकीर्दीला कलाटणी देणारा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. चित्रपटातील विद्याची भूमिका प्रेक्षकांच्या तसेच समीकेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. रेश्मा तिचे गाव सोडून चेन्नईमध्ये फिल्मस्टार बनण्यासाठी येते. आणि एके रात्री तिचे आयुष्य बदलून जाते. तीला ‘सिल्क’ म्हणून ओळखले जाऊ लागते , तिचे यश आणि कीर्ति तिला बदलवून टाकते.


हे हि वाचा – Amazone prime video: ‘फोटो प्रेम’ मराठी चित्रपटाचा प्रिमिअर ७ मे रोजी, ट्रेलर रिलिज

- Advertisement -