घरमनोरंजन'मणिकर्णिका'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर .... - कंगना रणौत

‘मणिकर्णिका’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर …. – कंगना रणौत

Subscribe

मणिकर्णिकाला जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर राष्ट्रीय पुरस्कारांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत होईल. असे मत कंगणाने व्यक्त केले आहे.

बॉलिवूडची क्वीन तसेच अभिनय कौशल्यासोबतच आपल्या भिडस्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कोणत्याही विषयावर स्पष्टपणे आपली मतं मांडणारी कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात आपले पाऊल ठेवले. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्यावर आधारलेल्या या चित्रपटात कंगणा मुख्य भूमिकेत होती. जानेवारी महिन्यात सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटास प्रेक्षकांकडून चांगलेच कौतुक झाले.

- Advertisement -

पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगणा रणौतने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मणिकर्णिका’ या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आहे. भारतातून चित्रपटसृष्टीकरिता दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार. मणिकर्णिकाला जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर राष्ट्रीय पुरस्कारांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत होईल. असे मत कंगणाने व्यक्त केले आहे. या राष्ट्रीय पुरस्काराकरिता मणिकर्णिका व्यतिरिक्त इतर कोणताच योग्य चित्रपट नाही. असे देखील कंगणाने म्हटले. यासोबतच, मणिकर्णिका चित्रपटाला बॉलिवूडकरांकडून पाठिंबा मिळाला नसल्याने नाराज झालेल्या कंगणाने आपला राग मीडियासमोर व्यक्त केला.

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

यापूर्वी कंगनाला ‘क्वीन’, ‘फॅशन’, ‘तन्नू वेड्स मन्नू’ या तीन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यामुळे आता ‘मणिकर्णिका’ साठी देखील आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असा विश्वास तिने माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे. ‘मणिकर्णिका’च्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आणि उत्तम अभिनय कौशल्यामुळे कंगणा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

- Advertisement -

कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत असून तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. त्याकरिता कंगना जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. जर या भूमिकेसाठी कंगनाचे कास्टिंग झाले तर, तिच्या सिनेकारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरेल. हा चित्रपट तमिळ आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -